आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी पाेर्टेबल हॅचरीज, युवकांसाठी राेजगाराच्या नव्या संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
मुंबई - मत्स्याेत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच चांगल्या प्रतीचे मत्स्यबीज तलावाजवळच सहजरीत्या उपलब्ध होण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत ‘पाेर्टेबल हॅचरीज’  उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. यासाठी सरकारकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याने यातून राेजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध हाेणार अाहेत.   
 
राज्यात दरवर्षी ११४ काेटी मत्स्यबीजांची गरज असून सरकारच्या मत्स्यबीज केंद्रांच्या माध्यमातून सध्या केवळ ३८ काेटी मस्यबीजांची निर्मिती हाेत असून  ही तूट शेजारच्या बिहार, छत्तीसगड, अांध्र प्रदेश गुजरात या राज्यांच्या मदतीने भरून काढली जात अाहे. त्यामुळेच राज्यातच मस्यबीजाची  निर्मिती करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला अाहे. मत्स्यबीज निार्मिती करण्यासाठी राज्यात ३० मत्स्यबीज उत्पादन केंद्रे, १६ मत्स्य संवर्धन केंद्रे, ४ काेळंबी बीज केंद्रे अशी एकूण ५० केंद्रे उपलब्ध अाहेत.   गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या सिमेंटने बांधलेल्या वर्तुळाकार उबवणी केंद्रातून मत्स्यबीजांची निर्मिती हाेत अाहे.  बिहार, तामिळनाडू, छत्तीसगड, झारखंड या राज्यात ‘पाेर्टेबल हॅचरीज’ मत्स्यबीज उत्पादन केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अाता त्याच धर्तीवर राज्यातही ही संकल्पना राबवण्यात येत अाहे.  भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट अाॅफ फ्रेश वाॅटर अॅक्वा कल्चर या संस्थेने यासाठीचे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. सध्या या पाेर्टेबल हॅचरीज पुणे, दापचेरी, खाेपाेली अादी मत्स्यबीज केंद्रांच्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार अाहेत.
 
अशी अाहे याेजना : एका पाेर्टेबल हॅचरीजची किमत सात लाख रुपये असून ३६ हॅचरीजसाठी २ काेटी ५२ लाख रकमेच्या प्रकल्प अहवालास शासनाने मंजुरी दिली अाहे. हा व्यवसाय सुरू करायचा असल्यास सरकारकडून ५० टक्के अनुदान (साडेतीन लाख रु.) मिळणार अाहेत. अंदाजे अर्धा एकर जागा व ५० टक्के भांडवलाची गरज अाहे. 
बातम्या आणखी आहेत...