आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Become Very Strong About Suspension Of MLA

निलंबनाच्या कारवाईबाबत विरोधक आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अपशब्द वापरल्याबद्दल मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्याविरोधात करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याच्या मुद्दय़ावरून विरोधी सदस्य सोमवारी आक्रमक झाले होते. त्यांच्या गदारोळामुळे सोमवारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.


सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होऊन घोषणाबाजी सुरू केली. त्याच वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अध्यक्षांकडे बोलण्याची परवानगी मागितली. तेव्हा वळसे पाटील यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारत विरोधी सदस्यांना आपापल्या बाकांवर बसण्यास सांगितले. सर्व सदस्य जागेवर बसल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी देतो, अशा सांगत वळसे पाटील यांनी विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले. विरोधी बाकांवरील घोषणाबाजी न थांबल्यामुळे त्यांनी कामकाज प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत तहकूब केले.

एपीआय सचिन सूर्यवंशी प्रकरणात जे सदस्य प्रत्यक्ष मारहाण करताना दिसत नव्हते, त्यांना सभागृहाबाहेर जावे लागले आणि मारहाण करणार्‍यांना काहीच झाले नाही, असा आरोप खडसे यांनी केला. तोपर्यंत सभागृहात घोषणाबाजी सुरूच राहिल्याने पुरके यांनी अध्र्या तासासाठी कामकाज स्थगित केले. पुन्हा कामकाजास सुरुवात झाली तरी गोंधळ कायम होता.


विरोधकांची अभिरूप विधानसभा
विरोधकांची आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृह तहकुबीनंतर मंगळवारी सायंकाळी अभिरूप विधानसभा चालवून सरकारचा अनोखा निषेध नोंदवला. काही सदस्य सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले, काही मंत्र्यांच्या जागेवर.. आमदार चैनसुख संचेती मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, नाना पाटोले गृहमंत्री, रवींद्र वायकर मुंबईचे विशेष मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण जलसंपदा मंत्री असल्याची स्वत:च ओळख करून दिली. अध्यक्ष म्हणून गिरीश बापट आणि उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बसवण्यात आले होते.