आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीवरून सरकारची कोलांट उडी; म्‍हणे, देणार नाही असे बोललोच कुठे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – शेतकरी आत्‍महत्‍या थांबवण्‍यासाठी कर्जमाफी हा शास्‍वत उपाय नाही, असे वक्‍तव्‍य मुख्‍यंत्री देवेंद्र फडवणी यांनी केले होते. त्‍यामुळे विरोधी पक्षांनी आज (गुरुवार) विधानसभेच्‍या दोन्‍ही सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. विरोधकांचे आग्रमक रुप पाहाता सरकारने कोलांटी उडी घेतली. मुख्यमंत्री कर्ज माफी देणार नाहीत, असे बोललेच नाहीत. त्‍यामुळे कर्जमाफीवर विचार होऊ शकतो, अशी भूमिका संसदीय मंत्री प्रकाश मेहता यांनी सभागृहात जाहीर केली. तसेच सर्व कामकाज बाजूला ठेवून कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचे सांगितले.
फडवणीस सरकारवर 302 गुन्‍हा का दाखल करू नये – धनंजय मुंडे
मागील सात राज्यात १८०० शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. असे असताना शासन शेतक-यांना मदत देत नाही, असे म्‍हणत आहे. परिणामी, शेतक-यांची परिस्थिती आणखी बिकट झाली असून, शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणी फडणवीस सरकारवर ३०२ चा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (गुरुवार) अधिवेशनात विचारला आणि शेतक-यांची कर्जमाफी झालीच पाहिजे ही आग्रही मागणी पुढे रेटली.
नेपाळ भूतानला मदत; मग आपल्‍याच शेतक-यांना का नाही - अजित पवार
मुंबई – राज्‍यातील शेतकरी तीन वर्षांपासून दुष्‍काळात होरपळत आहेत. पण, शासनाने त्‍यांना कर्जमाफी नाकारली आहे तर दुसरीकडे नेपाळ, भूटनाला कोट्यवधी रुपयांची मदत केली जात आहे. पण, आपल्‍याच शेतक-यांना का मदत दिली जात नाही, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवार) विधानसभेच्‍या अधिवेशनात केला आणि कर्जमाफी देण्‍याची आग्रही मागणीही त्‍यांनी केली.