आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकांचा अवमान करणाऱ्या परिचारकांचे निलंबन होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही : मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणूक प्रचारादरम्यान सैनिकांच्या पत्नीबद्दल आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उमटले. परिचारक यांच्या निलंबनाचा ठराव मांडणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषद विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  दिला.  

 मुख्यमंत्र्यांनी परिचारक यांचा निलंबनाचा ठराव अाणावा, अशी मागणी मुंडेंकडून येताच सर्व बाबी तपासून यासंदर्भात मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.  सैनिक व त्यांच्या पत्नीबद्दल काढलेल्या अाक्षेपार्ह वक्तव्याबद्दल विधान परिषदेत सर्वच सदस्यांच्या भावना तीव्र झाल्या हाेत्या.  मुख्यमंत्र्यांनी स्वतः परिचारक यांच्या निलंबनाचा ठराव मांडावा, सभागृह असा अपमान कदापी सहन करणार नाही, असे काँग्रेसच्या भाई जगतापांनी  म्हटले. तर  मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव न आणल्यास विरोधकांकडून परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणला जाईल, असे शरद रणपिसे यांनी खडसावून सांगितले. दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेच्या अामदार नीलम गोऱ्हे यांनीही याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला. परिचारकांनी हे वक्तव्य करून महिला आणि सैनिकांचा अपमान केला आहे. यामुळे आमदार म्हणून शरमेनं मान खाली गेली अाहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर या आमदाराला फासावर द्या, असं म्हणाले असते, असं सांगत शिवसेनेच्या आमदार  गोऱ्हे यांनी प्रशांत परिचारक यांच्याबाबत राजकारण न करता कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली. अामदार कपिल पाटील यांनी परिचारकांच्या वक्तव्याचा प्रश्न केवळ निषेधाने सुटणार नाही तर त्यावर निलंबन हा एकच उपाय असल्याचे सांिगतले. परिचारक यांच्या वक्तव्यामुळे देशाला जखम झाली असून ती न भरून येणारी असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी अामदार जयदेव गायकवाड यांनी या   वेळी बोलताना केली.  
 
सर्वानुमते निर्णय घेतला जाईल : निंबाळकर 
सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन काेणती कठाेर कारवाई करता येईल याचा विचार केला जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात सभापतींनी गटनेत्यांची बैठक घ्यावी व या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल, असे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी या वेळी सांगितले.   
 
सुनील तटकरे यांचा अभिभाषणावर टाेला  
राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शनाच्या प्रस्तावासोबत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. अभिभाषणाचा आभारप्रस्ताव मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी हरकत घेत अभिभाषण मंत्रिमंडळासमोर आल्यानंतर सर्व मंत्र्यांत एकवाक्यता होती का, पारदर्शी मंजुरी मिळाली की नाही, असे प्रश्न करत शिवसेनेला टोला लगावला.  
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, काय म्हणाले होते परिचारक.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...