आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil Blame On BJP Govt.

सरकारने दुष्काळी मदतीतून वगळली 24 हजारांवर गावे; विखे पाटीलांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांना टाळून राज्य सरकारने महाराष्ट्रातील २४ हजार ३०६ गावे दुष्काळी मदतीतून वगळली अाहेत, असा गंभीर अाराेप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली राज्य सरकारने वगळलेल्या गावांचा मदतीत पुन्हा समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन दिले.

विखे पाटील म्हणाले की, ‘गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाचे चटके बसत अाहेत. मात्र, राज्याची युतीचे सरकार त्याबाबत फारसे गंभीर असल्याचे दिसत नाही. नुकतीच राज्य सरकारने २१ जिल्ह्यांतील १५ हजार ७४७ गावांना ३५७८ कोटी रुपये दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला अाहे. परंतु हा निर्णय घेताना केंद्र शासनाच्या एप्रिल २०१५ रोजीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण झालेले नाही. राज्य सरकारने त्यानुसार निर्णय घेतला असता तर राज्यातील आणखी २४ हजार ३०६ गावांना या मदतीचा लाभ झाला असता. तसेच मुळातच शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यातही कठोर अटी लावून ही मदत मिळणे सरकारने कठीण केले आहे, असा अाराेपही विखे पाटील यांनी केला.

कापूस उत्पादकांवर अन्याय
दुष्काळीमदत देण्याच्या निर्णयातून कापूस उत्पादकांना वगळण्यात आले आहे. मराठवाडा विदर्भासारख्या कापूस उत्पादक पट्ट्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या असून मदत योजनेतून नेमके कापूस उत्पादकांनाच वगळल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली. कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याने सरकारने नुकसानीच्या आकडेवारीची प्रतीक्षा करता हंगामी स्वरूपात एकरी भरीव मदत जाहीर करावी, अशीही मागणी विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली अाहे.