आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Leader Vinod Tavade Comment On Marathwada Grant

मराठवाड्याचा निधी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पळवला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुष्काळाचे मुख्य केंद्र मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद आणि विदर्भातील काही भाग असताना येथील निधी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पळवल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी गुरुवारी केला.

ते म्हणाले, मदत आणि पुनर्वसन खात्याने आजपर्यंत 100 टक्के रक्कम केवळ चारा छावण्या आणि टँकरवरच खर्च केली. जळालेल्या बागा, कोरडवाहू शेतकर्‍यांना एक पैशाचीही मदत केली नाही. 4 मे 2012 ते 1 जून 2013 या कालावधीत सरकारने 738.47 कोटी रुपये छावण्यांवर खर्च केले. त्यापैकी औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत केवळ 2.85 टक्केच खर्च झाला. सातारा 104.32 कोटी, सांगली 99.9 कोटी, सोलापूर 211.37 कोटी, नगर 216.03 कोटी रुपये खर्च झाले. तर दुसरीकडे नाशिक 4.01 कोटी, औरंगाबाद 13.52 कोटी, बीड 64.07 कोटी, उस्मानाबाद 9.60 कोटी, जालना 7.55 कोटी आणि बुलडाण्यात केवळ अडीच कोटी रुपये खर्च झाले. निधी वाटपात असा दुजाभाव झाल्याचे तावडे म्हणाले.

केंद्र शासनाकडून राज्याला 1022 कोटी रुपये देण्यात आले असून त्यापैकी 49.95 कोटी चारा छावण्यांसाठी तर 29.15 कोटी रुपये पाणीपुरवठ्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याला देण्यात अले. तर 950 कोटी रुपये कोरडवाहू व बागायती शेतकर्‍यांसाठी इनपुट सबसिडी म्हणून मंजूर करण्यात आले. परंतु ही रक्कम शेतकर्‍यांसाठी न वापरता चारा छावण्या व टँकर्सच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आली. फळबागा जळालेल्या शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी 40 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणीही तावडे यांनी केली.