आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opposition Parties Very Aggresiv On Maratha Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण प्रश्नावरून विधान परिषदेत गदारोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी करत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत गदारोळ केला.

राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. हरी नरके जातीयवादी आहेत. त्यामुळेच हा आयोग मराठा समाजाची माहिती संकलित करण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप करत हा आयोगच बरखास्त करावा, अशी मागणी विक्रम काळे, जयंत जाधव, अमरसिंह पंडित, विनायक मेटे यांनी केली. आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असून नारायण राणे समितीशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मागासवर्गीय आयोगावरील सदस्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही त्यांना बदलले नसल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आयोगाचे सदस्य मराठा जातीबाबत पूर्वग्रह बाळगून आहेत. त्यामुळे आरक्षणाला विलंब होत आहे. मुदत संपल्याने नवे सदस्य नेमण्याची वारंवार मागणी केली; परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही मेटे यांनी केला. आयोगाने मराठा समाजाचे राज्यभर सर्वेक्षण करावे, असे आदेश दिले होते. परंतु केवळ 20 जिल्ह्यांतच सर्वेक्षण झाले. परिणामी संख्यात्मक माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आल्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. त्यामुळे आमदारांनी अधिकच गोंधळ करत कामकाज बंद पाडले.