आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धागे-दोरे बांधून कोणी कोणाच्या बंधनात अडकत नसते- राजची सेनेवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेने पाळलेल्या प्रतिज्ञा दिनाची व लाखो शिवसैनिकांना बांधलेल्या शिवबंधनाच्या धाग्याबाबत राजकीय वर्तुळात चौफेर टीका होत आहे. मनसेचे राज ठाकरे, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, नवाब मलिक यांच्यासह काँग्रेसच्या नारायण राणे, माणिकराव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
मुंबईत मनसेच्या नगरसेविकांच्या बैठका सुरू आहेत. त्यावेळी राज ठाकरेंनी शिवबंधन कार्यक्रमावर अप्रत्यक्ष टीका केली. राज ठाकरे म्हणाले, धागे बांधून कोणीही कोणाच्या बंधनात अडकत नसते. त्यासाठी लोकांत जाऊन काम करावे लागते.
तरूणांत मिसळा, त्यांचे काय म्हणणे ते ऐका, त्यांच्या समस्या समजून घ्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न करा.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी शिवबंधनाच्या धाग्या-दो-याबाबत विचारले असता ते म्हणाले, आमचे सहकारी नवाब मलिक यांनी कालच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात जादूटोणा कायदा लागू झाल्यामुळे त्या कलमात असे धागे-दोरे बसते का व त्यावर सरकार काही कारवाई करते का त्याकडे माझे लक्ष आहे असा चिमटा काढला.
काँग्रेसचे नारायण राणे म्हणाले, खरे तर मला या शिवसेनेबद्दल काही अपशब्द बोलावे असे वाटत नाही. उद्धव यांची शिवसेना खूपच कुमकुवत आहे व हलाखीच्या स्थितीतून जात आहे. त्यामुळे मी आजकाल काही बोलत नाही. काँग्रेसच्या माणिकरावांनी ठाकरेंनीही उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले. पक्षातील आपल्याच नेत्यांवर विश्वास नसल्याने ते असे काहीतरी उद्योग करीत आहेत. मात्र याचा काहीही फायदा होणार नाही. सेनेतील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत.
पवारांनी राज्यसभेसाठी दाखल केला अर्ज, पाहा आणि वाचा पुढे...