आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोकडरहित व्यवहार अभियान रूपात राबवा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : रोकडरहित व्यवहार हे अभियान म्हणून चालवण्याची गरज आहे. त्यासाठी राजकारण बाजुला ठेवून विरोधकांनी देखील यात सहभागी हाेऊन जनतेला प्रशिक्षित करावे, असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी केले. आऊटसोर्सिंग काम करणाऱ्या संस्थांनी अापल्या कामगारांना रक्कम देण्यासाठी कॅशलेस पेमेंटचा वापरकरावा, असेही ते म्हणाले.

टीजेएसबी सहकारी बँकेने ‘कॅशलेस अर्थव्यवस्था’ या विषयावर रविवारी मुंबईत अायाेजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. ते म्हणाले, विमुद्रीकरणापूर्वीही देशात अल्प प्रमाणात डिजिटल व्यवहार होत होते, पण निर्णयानंतर निर्माण वातावरण, व्यवस्थेमुळे डिजिटल व्यवहारांमधे मोठी वाढ हाेत अाहे. निर्णयानंतर विविध राज्यात रोकडरहित व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.

देशात आज बँकांपेक्षा एटीएम मशीनची संख्या जास्त आहे. या मशिनच्या देखभालीवर २१ हजार कोटी रुपये खर्च होत आहे. ही देशाच्या भविष्यासाठी चिंतेची बाब आहे. कॅशलेस व्यवहार अंमलात अाणले तर बँका व एटीएममध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डिजिटल मंचावर अाणण्यासाठी इफकाे, कृभकाे या कृषी संस्थांनी ग्रामीण भागात प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, की नाबार्डच्या खर्चातून १० हजारपेक्षा कमी लाेकसंख्या असलेल्या गावात दाेन पीअाेेएस मशिन उपलब्ध करून देण्यात येणार अाहेत.

ही मशिन प्राथमिक सहकारी संस्था किंवा कृषी सािहत्याची खरेदी विक्री करणाऱ्या केंद्रांच्या ठिकाणी लावण्यात येतील. यामुळे ग्रामीण भागातील ७५ काेटी लाेकसंख्येला फायदा हाेऊन शेतकरी डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करू शकतील, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...