आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : असे आहेत ओशो यांचे कम्यून, अशी आहे Life style

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- आचार्य रजनीश, कम्यूनचे एक दृश्य. - Divya Marathi
फाइल फोटो- आचार्य रजनीश, कम्यूनचे एक दृश्य.
20 व्या शतकातील आध्‍यात्मिक गुरुंमध्‍ये आचार्य रजनीश 'ओशो' यांचे नाव प्रामुख्‍याने घेतले जाते. 11 डिसेंबरला त्यांचा जन्मदिवस आहे. divyamarathi.com रजनीशशी संबंधित महत्त्वाची माहिती देणार आहे.
मुंबई - ओशो यांचे जगभरात असलेल्या कम्यूनविषयी नेहमी चर्चा होत असते. मात्र वास्तवात कम्यूनची संकल्पना वेगळी आहे. आचार्य रजनीश यांचा दावा होता, की त्यांची शिकवण जगाला संपूर्ण बदलून टाकेल. ते आपल्या अनुयायांना सांगायचे, की कम्यूनमध्‍ये तुम्हाला जे वाटेल ते करा, टॅबू सोडून द्या.
भारतासह इतर अनेक देशांमध्‍ये रजनीश यांचे कम्यून आहेत. आचार्य रजनीश यांच्या मतानुसार कम्यून याचा अर्थ होतो नवा संसार. जिथे देश नसेल, महानगर नसेल, कुटुंब नसेल. संपूर्ण पृथ्‍वीवरील जंगलात आणि बेटांवर राहत असलेले लाखो छोटे-छोटे कम्यून असावे. सर्वात छोट्या कम्यूनची सहज देखभाल करता यायला हवी. त्यात पाच हजार लोक असावे आणि सर्वात मोठ्या कम्यूनमध्‍ये पन्नास हजार लोक असावेत.
कसे कम्यून हवेत आचार्य रजनीश यांना...
> कम्यून एक महत्त्वाकांक्षा रहित जीवन घोषणा आहे. जिथे सर्वांना समान संधी मिळेल.
> खरा कम्यून, खरा कम्युनिझम, विकासाचे समान संधी उपलब्ध करुन देईल. प्रत्येक व्यक्तीच्या वेगळेपणाची स्वीकार केला जाईल.
> एक कम्यूनमध्‍ये आपण सर्वांनी स्वत:ची ऊर्जा, संपत्ती, सर्व एकाच ठिकाण ठेवले तर त्याने सर्व लोकांचे देखभाल करता येईल.
> जसे-जसे कम्यून समृध्‍द होईल, तसे प्रत्येक व्यक्तीला सुख समाधान मिळायला हवे.
>धर्माच्या किंवा समाजवादाच्या नावावर कोणाचाही बळी दिला जाऊ नये. कोणत्याही प्रकारच्या आत्मपीडाचे समर्थन केले जाऊ नये.
>मनुष्‍य येथे आनंद साजरा करण्‍यासाठी आहे. जेवढे शक्य आहे तेवढे आयुष्‍य सुंदर पध्‍दतीने, शांतीने, सुविधापूर्ण पध्‍दतीने जगले पाहिजे.
> कम्यून अशा पध्‍दतीने जीवन जगले पाहिजे की ज्याने ते अधिक समृध्‍द होती. त्यांना अधिक अपत्यांना जन्म देऊ नये. आवश्‍यकतेपेक्षा अधिक माणसांची संख्‍या वाढवू नये.
>सर्व कम्यून परस्परावलंबी असायला हवीत. मात्र ते विनिमय पैशाच्या माध्‍यमातून करणार नाहीत.
> कम्यून आदान-प्रदान करत राहतील. ते आपल्या आकाशवाणी केंद्रांमधून अशा अशा गोष्‍टी त्यांच्याकडे असल्याचे घोषित करतील.
> लोकांचा छोटासा समूह जीवनाचा आस्वाद अधिक घेऊ शकते. कारण इतके मित्र असणे, इतक्या लोकांना जाणून घेणे हाच एक स्वानंद असतो.
> कम्यून योग्य अर्थाने कुटुंब होईल आणि ती आजारांपासून मुक्त असतील.
> येथे एक बंधनमुक्त कुटुंब असेल,जो गतिमान असेल. मुलांचे पालनपोषण कम्यून करेल. प्रत्येक गरज कम्यून भागवेल. येथे विवाहाचे प्रश्‍न निर्माण होणार नाही आणि घटस्फोटाचाही.
> जर दोन व्यक्तींना एकत्र राहावे असे वाटले तर ते राहू शकतात. एखाद्या दिवशी वेगळे राहावे वाटले तर राहू शकतात. कम्यूनमध्‍ये वृध्‍दांना त्यांच्या अनुभवानुसार प्रेम आणि सन्मान दिला जाईल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा ओशो कम्यूनचे फोटोज...