आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad District Kangare Police Action API Suspended

‘रझाकारी’ एपीआयसह चौघे पोलिस निलंबित, उस्मानाबादप्रकरणी गृहमंत्र्यांनी दिले आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उस्मानाबाद जिल्ह्यातील कनगरा गावात झालेल्या मारहाण प्रकरणाची गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी बुधवारी दिले.
कनगरा गावात दारूबंदी करण्याची मागणी केल्यावरून गावकर्‍यांना त्यांच्या घरात घुसून पोलिसांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांवर राज्यभरातून टीका करण्यात आली. गृहमंत्री आर.आर. पाटील आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिस महानिरीक्षकांना दिले होते. त्यानुसार त्यांनी बुधवारी या गावाला भेट दिल्यानंतर तयार केलेला प्राथमिक चौकशी अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला. त्या अहवालानुसार या घटनेतील बेंबळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बनसोड, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई भोसले आणि पोलीस शिपाई शिंदे या चार पोलीस कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.