आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEWS @ MH: अल्पवयीन मुलीस पळविले; भाजयुमो उपाध्यक्षास चोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने वाहनातून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह त्याच्या मित्रावर अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी भाजयुमो पदाधिकार्‍याला चांगलाच चोप दिला.
मस्कावद येथील 15 वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेत पैसे भरण्यासाठी सावदा येथे आली होती. पैसे भरून बाहेर पडल्यावर विजय जिजाबराव पाटील (रा. सावदा) व त्याचा मित्र सागर संजय धांडे (रा.चिनावल) यांनी तिला जबरदस्तीने वॅगन-आर कारमध्ये बसवले. यानंतर चिनावल (ता. रावेर) येथे सागर धांडे याच्या घराच्या वरच्या मजल्यावर नेऊन तिला जीवे ठार मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीवर विजय जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या मोबाइलवर कॉल आला. तो बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून मुलीने तेथून शिताफिने पळ काढला. मस्कावद गाठून कुटुंबीयांना घडलेला प्रकार कथन केला. गावातील इतरांना ही माहिती मिळताच नागरिकांनी दुपारी सावदा गाठून विजय पाटीलचा माग काढला. सावद्यातील विर्शामगृहाजवळ तो सापडताच नागरिकांनी त्याला चोपले. ही घटना त्याच्या कुटुंबीयांना समजताच विजयचे वडील आणि भावाने विश्रामगृह परिसर गाठला. संतप्त नागरिकांनी त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली. विजय हा उपाध्यक्षाबरोबर पोलिस पुत्रही आहे.

उपाध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल- पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी सावदा पोलिसात विजय पाटील आणि सागर धांडेविरुद्ध तक्रार दाखल केली. दोघांवर अपहरण, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचे उपनिरीक्षक दिलीप खेटे यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई होईलच!- पोलिस दोन्ही आरोपींच्या मागावर असून तपासात ढिलाई होणार नाही. या प्रकरणी दोषी आढळणार्‍यांवर कारवाई होईलच. -बिपिन शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक, सावदा
(छायाचित्र: आरोपी विजय पाटील)
पुढे वाचा, गडचिरोली-गोंदिया विभागाचा नक्षल कमांडर पहाडसिंग आत्मसर्मपण करू शकतो...