आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीत ‘अाेटीएस’लाभ चालू वर्षातही; 31 जुलै 2017पर्यंत दिली मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पुन्हा नव्याने सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार ‘एक वेळ समझोता’ (वन टाइम सेटलमेंट- अाेटीएस) याेजनेत लाभ ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही प्राेत्साहनपर लाभ मिळणार अाहे. पूर्वी ही मुदत ३१ जुलै २०१६ पर्यंतच हाेती. या याेजनेत दीड लाखापेक्षा अधिक रकमेचे कर्ज शेतकऱ्यांनी एकाच वेळी भरल्यास त्यांना २५ हजारांपर्यंत प्राेत्साहनपर रक्कम दिली जाणार अाहे. तसेच ही एकरकमी कर्ज परतफेडीची मुदत ३१ डिसेंबर २०१७ हून ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्यात अाली अाहे. 


सहकार आणि पणन विभागाने गुरुवारी याबाबतचा सुधारित आदेश जारी केला. अगोदरच्या निर्णयानुसार थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची कर्जाची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरणे बंधनकारक केले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरण्यास हतबलता व्यक्त केली हाेती. त्यामुळेच आता ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 


सरकारने २०१६-१७ या कालावधीत कर्ज घेतलेल्या; परंतु ३१ जुलै २०१६ ते ३१ जुलै २०१७दरम्यान पीककर्जाचा देय दिनांक असलेल्या शेतकऱ्यांनाही आता प्रोत्साहनपर रकमेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला अाहे.


कर्जमाफी किंवा ‘अाेटीएस’ एकाचाच मिळेल लाभ  
पूर्वी कुटुंबास कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ या दाेन्ही याेजनांचा लाभ हाेता, मात्र त्यासाठी दाेन्ही मिळून दीड लाख मर्यादा होती. आता यात बदल करण्यात अाला. एका कुटुंबाला प्रोत्साहनपर लाभ किंवा कर्जमाफी यापैकी एकाचाच लाभ घेता येईल.  यात दीड लाखापर्यंतची कर्जमाफी किंवा ‘अाेटीएस’मध्ये २५ हजार प्राेत्साहनपर रकमेचा लाभ मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...