आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय मल्ल्याला ठेवण्यासाठी आमच्या कारागृहात सर्व सुविधा; राज्य सरकारचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय माल्यावर भारतीय बॅंकांचे 9,432 कोटी रुपये बुडविल्याचा आरोप आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
विजय माल्यावर भारतीय बॅंकांचे 9,432 कोटी रुपये बुडविल्याचा आरोप आहे. (संग्रहित फोटो)

मुंबई-   भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला ठेवण्यासाठी आर्थर रोड कारागृहात सर्व सुविधा असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या वकिलाने भारतीय कारगृहात योग्य सुविधा नसल्याचा दावा केला होता.

केंद्र सरकारला पाठवला अहवाल

-  कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक  बी. के. उपाध्याय यांनी divyamarathi.com शी बोलताना सांगितले की, आम्ही याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला आहे. युरोपमधील कारागृहात असतात त्या सर्व सुविधा येथे असल्याची माहितीही दिली आहे. 

- विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते. याबाबत ते म्हणाले की, आम्ही सर्व महत्वाच्या कागदपत्रांसोबत केंद्राला अहवाल पाठवला आहे. यापेक्षा याबाबत जास्त वोलता येणार नाही.

- सक्तवसुली संचलनालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या केलेल्या मागणीवर युक्तीवाद करताना मल्ल्याच्या वकिलाने आपल्या आशिलाची विशेष काळजी घेण्याची गरज असून, त्याला डायबेटिज असल्याचे सांगितले होते. याशिवाय युरोपीयन पध्दतीचे टॉयलेट आणि सरकारी रुग्णालयांमधील असुविधांचा मुद्दाही मल्ल्याच्या उपस्थित केला. राज्य सरकारने मल्ल्याच्या वकिलाचा दावा हा फेटाळून लावला आहे. 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...