आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Our Party Increases Marathi Film Business, Maharashtra Navnirman Sena Claimed

मराठी चित्रपटांचा व्यवसाय आमच्या पक्षामुळे वाढला, मनसेचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्याचा निर्णय घोषित झाल्यानंतर काही मल्टिप्लेक्स मालकांनी मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना दुस-या आठवड्यातल्या गल्ल्याची टक्केवारी वाढवून दिली आहे. वाढलेली ही टक्केवारी आपल्या पक्षामुळे झाल्याचा दावा मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खाेपकर यांनी केला अाहे.

राज्य सरकार एकीकडे प्राइम टाइमसारख्या घाेषणा अमलात अाणत असताना मराठी निर्मात्यांना मनसेकडे धाव का घ्यावीशी वाटली व ही समांतर यंत्रणा तयार करण्याचे प्रयोजन का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मंगळवारी मनसेच्या दादर येथील राजगड या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दिग्दर्शक संजय जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर, संजय छाब्रिया, नानुभाई, रवी जाधव या मराठी चित्रपट व्यवसायातील निर्माते, काही मल्टिप्लेस मालक उपस्थित होते. या बैठकीत मल्टिप्लेक्समध्ये दाखवल्या जाणा-या मराठी चित्रपटांना आठवड्यानुसार मिळणारा गल्ला वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार सध्या पहिल्या आठवड्यात ४५ टक्के वाटा मराठी चित्रपट निर्मात्यांना मिळतो, हा वाटा दुस-या आठवड्यातही ४५ टक्केच मिळेल यावर सर्वांची सहमती झाल्याचे खोपकर यांचे म्हणणे आहे. हा टक्का वाढावा म्हणून मराठी निर्माते व मनसेचा आग्रह होता तो मल्टिप्लेक्सधारकांच्या गळी उतरवण्यात यश अाल्याचाही खाेपकर यांचा दावा अाहे.

बोनसचा फायदा कोणाला
९ काेटींहून अधिक व्यवसाय करणा-या चित्रपटाच्या वाट्यामध्ये मल्टिप्लेक्सकडून २.५ टक्के बाेनस दिला जाईल, असेही अाश्वासन या बैठकीत देण्यात अाले. पण "टाइमपास-१' वा "टाइमपास-२' वा "दुनियादारी' या सारखे क्वचितच काही माेजकेच चित्रपट इतका अाकडा गाठतात तेव्हा या बाेनसचा फायदा नेमका कुणाला असाही प्रश्न निर्माण हाेताे.

प्रश्न सुटत असतील तर आम्हाला आनंदच
‘जर बाहेरच्या बाहेर मराठी चित्रपटांचे मल्टिप्लेक्सच्या बाबत प्रश्न सुटत असतील तर अाम्हाला अानंदच अाहे. कायद्यात राहून सरकारला जे करता येते ते अाम्ही केले, असा टोला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी लगावला.

जिकडे फायदा तिकडे अाम्ही जाऊ
मराठी चित्रपटाच्या भल्यासाठी जर कुणी काही करत असेल तर अाम्ही निश्चितच त्यांचे सहकार्य घेऊ. म्हणूनच अाम्ही मनसेच्या बैठकीस उपस्थित राहिलाे व उद्देशास दुजाेरा दिला.
संजय जाधव, दिग्दर्शक