आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Owasi In Prison,why Should Togadia Free ? Abu Azami's Question

ओवेसी कोठडीत, मग तोगडिया मोकळे का? - अबू आझमी यांचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केले म्हणून एआयएमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना कोठडीत डांबले; पण तोच न्याय विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना मात्र लावला गेला नाही. देशात मुस्लिमांना वेगळा न्याय दिला जात आहे,’ असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. अफझल गुरू याला फाशी देण्यापूर्वी त्याच्या नातेवाइकांना कल्पना न दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली.

आझमी म्हणाले, स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) या संघटनेवर बंदी लादली जाते; पण राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) मात्र मोकळे रान दिले जाते. अक्षरधाम मंदिरात घुसलेल्या अतिरेक्यांवर गोळ्या झाडल्या जातात; पण बाबरी मशीद पाडणा-यांना साधी अटकही होत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोघे एकाच माळेचे मणी आहेत.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना फाशी देऊ नका, असा ठराव तामिळनाडू विधिमंडळात मंजूर झाला तरी चालतो; पण जम्मू्-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफझल गुरूच्या फाशीबद्दल जाहीर केलेल्या नाराजीवर मात्र आक्षेप घेतले जातात, असे स्पष्ट करत गुरूच्या फाशीचे काँग्रेसने राजकारण केल्याचा आरोप आझमींनी केला. कायद्याच्या राज्याची बूज राखता येत नसेल तर काँग्रेसने हुकुमत सोडली पाहिजे, असा इशारेवजा सल्लाही आझमींनी केंद्रातील यूपीए सरकारला दिला.