आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:चे, भाड्याचे घर घेण्याबाबत मुंबई सर्वात महागडे शहर, ‘अर्थयंत्र’ने जाहीर केला वार्षिक ‘बाय व्हर्सेस रेंट’ अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : स्वत:चे घर खरेदी करायचे असेल किंवा भाडे तत्त्वावर घर घ्यायचे असेल तर मुंबई देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. मुंबईनंतर दिल्ली-एनसीआरचा दुसरा क्रमांक लागतो. तर भारतात हैदराबाद सर्वात स्वस्त शहर असून दुसऱ्या क्रमांकावर इंदूर शहराचा क्रमांक लागला आहे.
गुंतवणुकीबाबत जयपूर सर्वात आवडीचे शहर ठरले आहे. तर मालमत्ता खरेदीबाबत अहमदाबाद सर्वात सुविधाजनक शहर ठरले आहे, असा दावा आर्थिक सल्लागार संस्था अर्थयंत्रच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे.
संस्थेने सोमवारी ‘बाय वर्सेज रेंट रिपोर्ट’ जाहिर केला. यामध्ये देशातील १२ मोठ्या शहरांबाबत माहिती देण्यात आली आहे. यात इंदूर, जयपूर, मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोची आणि लखनऊबाबत माहिती दिलेली आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती गेल्या वर्षभराच्या तुलनेत सरासरी ३.६ टक्क्यांनी तर यादरम्यान भाडे ४.९ टक्क्यांनी वाढले आहे. पुढील वर्षीदेखील अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज या अहवालात नमूद करण्यात आला आहे.
घर खरेदी करणे असो वा ते भाडे तत्त्वावर घेणे असो, याबाबत मुंबई सर्वात महागडे शहर ठरले असल्याचे अर्थयंत्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन व्याकरणम यांनी सांगितले आहे. तर राजस्थानमधील जयपूर गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वांचे आवडते ठिकाण ठरत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे या दोन्हींबाबत अहमदाबाद शहर अत्यंत चांगले मानले गेले आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा व्यक्ती अहमदाबादमध्ये घर खरेदी करण्याचा विचार करू शकतात.
वर्षभरात घर खरेदी करणे ३.६% तर भाडे ४.९% महागले
बातम्या आणखी आहेत...