आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय म्‍हणाले होते आबांंविषयी त्‍यांचे शिक्षक, शिक्षणतज्ञ प्राचार्य. डाॅ. पी. बी. पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अार. अार. पाटील यांनी थाेर विचारवंत, शिक्षणतज्ञ प्राचार्य. डाॅ. पी. बी. पाटील यांच्या शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये ‘कमवा व शिका’ या याेजनेतून कला शाखेची पदवी घेतली. अार. अार. यांचे गुरु म्हणून डाॅ. पाटील यांची विशेष अाेळख हाेती. मागील वर्षी त्यांचे देखील निधन ‌झाले. एका मुलाखतीदरम्यान डाॅ. पाटील यांनी अार. अार. अाबाविषयी म्हणजे अापल्या विद्यार्थ्याविषयी व्यक्त केलेल्या भावना....
अार. अार. चा शिक्षक असल्याचा अभिमान.....
अार. अार. दुष्काळी भागात अाणि निराधार घरात जन्मलेला तरुण. त्याचा स्वभाव अाणि धारणा प्रभावी, परिस्थितीची जाणीव. अत्यंत संयमी अाणि समजदार असा नेता . जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रीपद ही अार. अार. ने घेतलेली झेप नक्कीच काैतुकास्पद अाहे. असे नेते जर राजकारणात रािहले तरच राजकारणाला काहीतरी चांगली दिशा मिळेल. राजकारणामुळे जे पैसा, पद , प्रतिष्ठा अाणि सत्ता हातात येते याचा कशासाठी उपयाेग करायचा याची जाण असलेला ताे राज्यकर्ता अाहे. त्यामुळे अार अार पाटलांचा शिक्षक हाेताे, याचा मला अभिमान वाटताे.
अार. अार.चे अाश्चर्य वाटते....
अाज अापल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री व्हावं म्हणून पुढारी मारामारी करतात. ते जिल्ह्याचं नाव घेतात, पण काम मात्र अापल्या मतदारसंघाचच करता. हा मनुष्य उठताे अाणि मला नक्षलग्रस्त गडचिराेलीचे संपर्कमंत्री द्या असे म्हणताे. तर या राजकारणाच्या सर्कशीमध्ये अार. अार. टिकताे कसा याचं मला फार अाश्चर्य वाटतं.