आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्यक्ती आणि वल्ली’ चा प्रयोग 16 वर्षांनी पुण्यात रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- ‘क्षत्रियकुलावतंस राजा शिवछत्रपती...’ अशी घोषणा देत इतिहासात रमणारे हरितात्या असो वा मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत फिरणारे कोकणातले अंतू बर्वा असोत.. एकाहून एक वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आणि वल्ली रेखाटणार्‍या पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित ज्येष्ठ नाटककार-लेखक रत्नाकर मतकरी यांनी नाट्यरूपांतर केलेल्या नाटकाचा प्रयोग पुलंच्या जयंतीस 8 नोव्हेंबर रोजी पुणे येथे रंगणार आहे.

चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक सोळा वर्षांनी पुन्हा मंचावर येत आहे. मुंबईत रविवारी 10 नोव्हेंबर रोजी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. सुयोग परिवाराच्या जोडीला यंदा अश्वमी, अद्वैत या नाट्यसंस्थांच्या निर्मितीस सिनेमंत्रसह जोड लाभली आहे. पूर्वी हे नाटक फक्त सुयोग परिवार करीत असे व अतुल परचुरे पुलंची भूमिका करत असे. या वेळीही पुलंची भूमिका अतुल परचुरे साकारणार आहेत. नारायणची भूमिका संदीप पाठक साकारणार असून त्यांच्या जोडीला पुष्कर र्शोत्री, उपेंद्र लिमये, वैभव मांगले, सुनील बर्वे, राजन भिसे, विद्याधर जोशी, सुनील चौघुले, वैजयंती चिटणीस, चिन्मय केळकर, भालचंद्र कदम आदी दिग्गज कलाकार ‘व्यक्ती आणि वल्ली’मधल्या सखाराम गटणे, हरीतात्या, अंतू बर्वा आदी व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

नाटकाची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून अशोक पत्की यांचे संगीत या नाटकास लाभलेले आहे.