आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त दराने पाणी विकणाऱ्या २५६ दुकानांवर खटले दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छापील किमतीपेक्षा जास्त दराने पॅकबंद पाणी बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील विविध सिनेमागृहे, मॉल, रेल्वे व बसस्थानके, फूड मॉल, हॉटेल यांच्यावर वैधमापनशास्त्र यंत्रणेने कारवाई करून एकूण २५६ दुकानांवर खटले दाखल केले आहेत. मागील आठवडाभरात विशेष मोहीम राबवून यंत्रणेने ही कारवाई केली.

पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी यंत्रणेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राज्यात विविध ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश वैधमापनशास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानंतर विशेष पथकाने केलेल्या तपासणीमध्ये पॅकबंद पाणी बाटलीची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या २३३, छापील किमतीत खाडाखोड केल्याप्रकरणी तीन, आवश्यक माहिती न छापणाऱ्या नऊ, विहित आकारमानात माहिती न दिलेल्या एक व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० अशा एकूण २५६ आस्थापनांवर कारवाई केली.

इथे करा तक्रार
छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्याच्या घटना आढळून आल्यास वैधमापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २२८८६६६६ आणि व्हॉट्सअॅप क्रमांक ९८६९६९१६६६ वर, dclmms_comlaints@yahoo.com या ई-मेलवर किंवा यंत्रणेच्या फेसबुक पेज (Legal Metrology Maharashtra Consumer grievances) या ठिकाणी तक्रार करण्याचे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...