आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवनराजे हत्याकांड: पद्मसिंह पाटलांचा साक्षीदारांवर दबाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील मुख्य आरोपी व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील खटल्यातील साक्षीदारांवर दबाव आणत असल्याचे शपथपत्र सीबीआयने हायकोर्टात सादर केले आहे. यामुळे साक्षीदार उलटत असून, पद्मसिंहांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली आहे.
प्रतिज्ञापत्रात 20 पैकी सहा साक्षीदारांची नावे आहेत. हत्याकांडाचा खटला अलिबाग सत्र न्यायालयात सुरू असताना फिर्यादी पक्षाला सहा साक्षीदार फितूर घोषित करावे लागले. पाटील साक्षीदारांवर दबाव आणत असल्यामुळे साक्षीदार अगोदरचे जबाब नाकारत आहेत, असे प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.
पवनराजे 3 जानेवारी 200६ रोजी मुंबईहून पुण्याकडे निघाले असताना कळंबोलीजवळ त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यात त्यांचा चालक समद काझीदेखील मारला गेला. यामागे पद्मसिंहांचा हात असल्याचा आरोप निंबाळकर कुटुंबीयांनी केला होता. हत्येच्या कटाच्या आरोपाखाली जून 200९मध्ये पाटील यांना अटक करण्यात आली. 25 सप्टेंबर 200९ रोजी त्यांना सत्र न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर तीन दिवसांतच सीबीआयने जामीन रद्द करावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. जुलै 2011मध्ये सुरू झालेल्या खटल्यात सीबीआयने 20 साक्षीदार तपासले आहेत.
पवनराजेंच्या खुनासाठी मुख्य आरोपी पद्मसिंह यांनी आरोपींना 30 लाख रुपये दिल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. राजकीय कारकिर्दीत अडथळा ठरत असल्यामुळे पद्मसिंहांनी हत्येचा कट रचल्याचा सीबीआयचा कयास आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर निशाणा
पद्मसिंह पाटलांना दहा हजारांचा दंड