मुंबई - संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी पद्म पुरस्काराबाबत खळबळजनक विधान केले आहे. ‘समाजवाद्यांनी पद्मश्री आणि पद्मभूषणवर लाथ मारायला हवी. पद्म पुरस्कार फक्त बेइमान व्यक्तींना तसेच समाजातील उच्च वर्गातील व्यक्तींनाच मिळतात,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
एका ज्येष्ठ समाजवादी नेत्याचा शुक्रवारी रात्री सत्कार करण्यात आला. त्यावेळी यादव म्हणाले, ‘या वर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत एकही दलित, आदिवासी आणि शेतकरी नाही. गेल्या ६८ वर्षांपासून हेच होत आहे.’ समारंभानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतानाही ते या वक्तव्यावर ठाम होते. ‘मी जे बोललो, ते बोललो,’ असा पुनरुच्चार शरद यादव यांनी यावेळी बोलताना केला.