आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मश्री घ्यायलाच नको होता, टीकेचा धनी झालेला अभिनेता सैफ अलीची प्रथमच कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पद‌्मश्री पुरस्कारासाठी निवड झाल्यापासून अभिनेता सैफ अली खान टीकेचा धनी झाला अाहे. त्याचा हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी जाेर धरत असताना सैफने अाता माैन साेडले अाहे. ‘खरे तर मी हा पुरस्कार स्वीकारायलाच नकाे हाेता,’ अशी जाहीर कबुली त्याने प्रथमच दिली अाहे.
सैफ म्हणाला, "पद्मश्री' स्वीकारण्याबाबत माझ्या मनाची दोलायमान अवस्था होती. तो न स्वीकारण्याकडेच माझा कल होता. मात्र, वडिलांनी सरकारला नकार देणे याेग्य नसल्याचे सांगत फेरविचार करण्याचा सल्ला दिला हाेता. त्यामुळे २०१० मध्ये मी हा सन्मान स्वीकारला. मात्र, तेव्हा मी माझ्या मनाचेच ऐकायला हवे होते,’ असेही तो म्हणाला. काळवीट शिकार प्रकरण आणि अनिवासी भारतीयाला मारहाण असे दोन खटले सैफविरोधात सुरू आहेत. त्याविषयी सैफ म्हणाला, ‘या गैरवर्तनाबाबत मला खंत वाटते. हे दोन्ही खटले लवकरच बंद होतील. भविष्यात अशा घटना पुन्हा न होण्याबाबत मी काळजी घेईन.’
करिनाचा सैफला पाठिंबा
पद्मश्री सन्मानाबद्दल सैफविरोधात टीका होत असताना त्याची पत्नी व अभिनेत्री करिना कपूर मात्र त्याच्या पाठीशी अाहे. ‘सैफने सरकारकडे पुरस्कार मागितला नव्हता’, असे तिने सांगितले होते. त्यानंतरही बराच वाद निर्माण झाला होता.