आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दी‍पिका पादुकोणसाठी 400Kg सोन्याचे दागिने; 200 सूवर्ण कारागिरांनी केली 600 दिवस कलाकुसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 160 कोटींचा बजेट असलेला आगामी सिनेमा 'पद्मावती' सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही राणी पद्मावतीच्या भुमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी कॉस्ट्यूम्स आणि ज्वेलरीवर खूप परिश्रम घेतले आहेत. 1 डिसेंबरला हा सिनेमा रिलिज होत आहे.

सिनेमात दीपिकाने वजनदार वस्त्र आणि दागिने परिधान केले आहेत. त्यामुळे अनेक सीन्ससाठी संजय लीला भन्साली यांना मोठी कसरत करावी लागली आहे.

200 सूवर्ण कारागिरांनी 600 दिवस केली कलाकुसर...
- 'पद्मावती'साठी अर्थात दीपिकासाठी वजनदार दागिने बनवण्यासाठी 200 सूवर्ण कारागिरांनी तब्बल 600 दिवस परिश्रम घेतले. दागिन्यांसाठी 400 किलो सोने वापरल्याची माहिती मिळाली आहे.
- 'तनिष्क'च्या डिझाइन मॅनेजर क्वेटा रावत यांनी सांगितले की, डिझाइन्ससाठी त्यांनी खूप रिसर्च केला होता.
 - त्यांच्या टीमने अनेक राजा महाराजांचे फोटोज आणि स्कल्पचर पाहिले होते.
- देशभरातील अनेक म्युझियममध्ये जाऊन दागिन्यांची डिझाइन्स तयार केल्या होत्या.
- एक सिंगल पीस बनवण्यासाठी पाच सूवर्ण कारागिरांची मदत घ्यावी लागली होती.
- डिझाइन टीमने सोने, मोती, ओपल्स, टोपाज, रत्न आणि कुंदन वापरले.

अशी झाली होती तनिष्कची प्रारंभ...
- जरसेक्स देसाई यांनी दोन शब्द एकत्र करून 'तनिष्क' या ब्रँडची निर्मिती केली आहे. 'तन' अर्थात शरीर आणि 'निष्क' अर्थात 'आभूषण'.
- 'तनिष्क'चा कारखाना होसूर येथे असून तो 135,000 वर्गफूट परिसरात विस्तारित आहे .
- सर्वात आधी 'तनिष्क' यूरोपियन आणि अमेरिकन मार्केटमध्ये लॉन्च करण्‍यात आले होते.
- मात्र, ब्रँडची सुरुवात 1994 मध्ये कर्नाटकातील बंगळुरुमध्ये झाली होती. 18 कॅरेट सोन्याचे स्टोन्स बसवलेल्या घडाळी विक्री केल्या जात होत्या.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... पद्मावती सिनेमासाठी अशी बनले दागिने...
 
बातम्या आणखी आहेत...