आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paes Moves Court For Daughter's Permanent Custody

मुलीचा ताबा मिळण्यासाठी लिएंडर पेसने ठोठावले न्यायालयाचे दार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस याने मुलीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पेस आणि रिहा पिल्लई लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. यादरम्यान त्यांना एक मुलगी झाली. रिहा मुलीचा व्यवस्थित सांभाळ करत नसल्याने आपल्याला तिचा कायमस्वरूपी ताबा मिळावा, अशी मागणी पेसने याचिकेत केली आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय रिहाने आपल्या मुलीला भेटू नये, असेही त्याने या याचिकेत म्हटले आहे. तिच्या बेजबाबदार वागणुकीमुळे पेसने ही याचिका दाखल केली आहे. रिहा ही अभिनेता संजय दत्तची पूर्वीची पत्नी आहे. पेस आणि रिहाचे लग्न झाले नाही, मात्र 2003 पासून ते एकत्र राहत होते.