आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिएंडर पेस, रेहा यांनी मुलीसाठी वाद मिटवावा; हायकाेर्टाचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टेनिस स्टार लिएंडर पेस आणि त्याची विभक्त झालेली पत्नी रेहा पिल्लई यांनी मुलीच्या भल्यासाठी सामोपचाराने त्यांच्यातील वाद मिटवावा, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत दोघांनाही समोरासमोर बसून वाद सोडवावा, असे न्यायालयाने म्हटले. याला प्रतिसाद देत पेसच्या वकिलांनी अटींसह आपले म्हणणे सादर केले. मात्र, रेहाच्या वकिलांनी हा प्रस्ताव नाकारला. पेस आणि त्याच्या पालकांनी आपला छळ केल्याचे रेहाने दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. तसेच आपल्याला पेसच्या घरातून बाहेर काढू नये. दैनंदिन खर्चासाठी काही रक्कम देण्यात यावी, अशी मागणी रेहाच्या वतीने करण्यात आली. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...