आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षपदाला अखेर सेन्सॉर बोर्डाची \'कात्री\'; प्रसून जोशी नवे अध्यक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे (सेन्सॉर) वादग्रस्त अध्यक्ष पहलाज निहलानी यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. गीतकार प्रसून जोशी यांची सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनलाही सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.

पहलाज निहलानी यांनी जानेवारी 2015 मध्ये बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली होती.  निहलानी यांनी तीन वर्षांच्या कार्यकिर्दीत अनेक वाद ओढावून घेतले होते.

निवडणुकीच्या काळात मोदींचा व्हिडिओ केला होता प्रोड्यूस...
- 14 वर्षाच्या वयात पहलाज निहलानी यांनी स्मॉल टाइम डिस्ट्रिब्यूटरच्या माध्यमातून आपले करियर सुरु केले होते.
- 1975 मध्ये त्यांनी स्वत:ची डिस्ट्रिब्यूशन कंपनी सुरु केली.
- 'शोला और शबनम', 'दिल तेरा दीवाना', 'आंखें' आणि 'अंदाज' सारखी हिट सिनेमे प्रोड्यूस केले होते.
- निहलानी यांनी 2014 च्या निवडणूक कॅम्पेनमध्ये मोदींचा व्हिडिओ प्रोड्यूस केला होता. 'हर-हर मोदी, घर-घर मोदी' असे त्याचे टायटल होते.

गाय आणि गुजरात सारखे शब्द 'बीप' करण्याचा आदेश
- अमर्त्य सेन यांच्यावर आधारित सिनेमा "द ऑर्गुमेंटेटिव्ह इंडियन' मध्ये सेन्सॉरने गाय, हिंदु इंडिया आणि गुजरात सारख्या शब्दांवर बीप करण्याचे आदेश दिले होते.

'उडता पंजाब'वरून सापडले होते वादाच्या भोवर्‍यात.... .
- 2015 मध्ये निहलानी यांच्या नेतृत्त्वात सेन्सॉर बोर्डने जेम्स बॉन्ड सीरीजचा सिनेमा Spectre ला भारतान प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, सिनेमातील अनेक सीन्सला त्यांनी कात्री लावण्याचे निर्देश दिले होते.
- शाहिद कपूरचा ‘उडता पंजाब’ या सिनेमावरून निहलानी यांनी दुसरा मोठा वाद ओढवून घेतला होता. पंजाबमधील ड्रग्सच्या समस्येवर भाष्य करण्यार्‍या सिनेमालाही त्यांनी अनेक ठिकाणी कात्री लावण्याचे निर्देश निले होता. त्यावरून मोठा वाद झाला होता.
- कोंकणा सेनचा ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ आणि नवाझउद्दीन सिद्दीकीच्या ‘बाबूमोशाय’ला सर्टिफिकेशन देण्यावरून सेन्सॉर बोर्ड वादात अडकले होते.

यांचीही नावे होती अध्यक्षपदाच्या शर्यतीत...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलाज निहलानी यांची हकालपट्टी निश्चित होती. त्यांच्या जागी निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा आणि ‘चाणक्य’ मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश यांच्या नियुक्तीची चर्चा होती. पण या दोन्ही नावांना बाजूला करत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसून जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

पुढील स्लाइडवर वाचा... पद्मश्रीने सन्मानीत आहेत प्रसून जोशी
बातम्या आणखी आहेत...