आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेडन्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांची आज सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला आहे. मात्र, त्यांच्या या राजीनाम्याचा फायदा त्यांना पेडन्यूज प्रकरणात होणार का अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. शुक्रवारी म्हणजेच 23 मे रोजी निवडणूक आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आयोगाने चव्हाणांना दोषी ठरवल्यास त्यांना खासदारकीही गमवावी लागू शकते.

अशोक चव्हाण यांनी 2009 च्या विधानसभेत भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी राज्यातल्या विविध वर्तमानपत्रांत अशोकपर्व नावाने दिलेल्या बातम्यांना आक्षेप घेऊन त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या डॉ.माधवराव किन्हाळकर यांनी पेडन्यूजचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सुनावणीसाठी येणार असून शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.