आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Singer Gulam Ali\'s Film Song Lonching Program Canceled In Mumbai

पाकिस्तानी गायक गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानातील प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा २९ जानेवारी राेजी मुंबईत हाेणारा कार्यक्रम अायाेजकांनी काेणतेही कारण न देता रद्द केला अाहे. अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द हाेण्याची ही दुसरी वेळ अाहे. यापूर्वी शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे अायाेजकांनी माघार घेतली हाेती.
चित्रपट निर्माते सुहैब इलियासी यांच्या ‘घर वापसी’ या चित्रपटाच्या संगीताचे लाॅचिंग करण्यासाठी गुलाम अली २९ राेजी मुंबईत येणार हाेते. या चित्रपटात गुलाम अली यांनी अभिनयासह एक गीतही गायलेले अाहे. या कार्यक्रमासाठी इलियासी यांनी राज्य सरकारकडे सुरक्षेचीही मागणी केली हाेती.
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेने प्रचंड विरोध केल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तसेच अली यांनी आपले भारतातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलले होते. आता दिग्दर्शक साहिब इलायसी "घरवापसी' हा चित्रपट घेऊन येत आहेत. यात अली यांनी "अपनी मिट्टी की खुशबू है रगो में यह बसी है ' हे गीत गायिले आहे. या चित्रपटात अालोकनाथ आणि फरिदा जलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या कार्यक्रमाला सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती.

शिवसेनेच्या भूमिकेकडे होते लक्ष
पाकिस्तानी कलाकारांना मुंबई बोलावून कार्यक्रम घेण्यास शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. गेल्या वर्षी पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांना मुंबईतील कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले होते. त्यानंतर गुलाम अली यांच्याही कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. आता अली यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागवून होते.