आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Deploys Special Army Commandos To Secure Dawood Ibrahim

EXCLUSIVE: पाकला भिती, दाऊद नजरकैदेत; राजन 3 दिवसांत येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची/मुंबई - छोटा राजनला अटक केल्‍यानंतर आता पाकिस्‍तानने मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमला नजरबंद केले आहे. त्‍याच्‍याविषयी थोडीही माहिती भारतीय गुप्तचर संस्थांकडे पोहोचणार नाही याची विशेष काळजी पाककडून घेतली जात आहे. दाऊदवर 24 तास नजर ठेवण्‍यात येत आहे. पाकिस्तान आणि मुंबई पोलिसांच्‍या सुत्रांनी सोमवारी dainikbhaskar.com ला याविषयीची माहिती दिली.
दाऊदवर असे आहे लक्ष ?
> दाऊदला दिवसभरातील कम्युनिकेशनचे डिटेल्स ISI ला सांगावे लागतात.
> दाऊदला 2 मिनिटपेक्षा जास्‍त कॉलिंग करायची असेल तर त्‍याला परवानगी घ्‍यावी लागते.
> पाकिस्तान सरकारने अशी व्‍यवस्‍था केली आहे की, दाऊदला रात्री झोपण्‍यापूर्वी सॅटेलाइट फोन सहित सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्‍हाइसेस ड्यूटीवर असलेल्‍या ISI च्‍या अधिका-याजवळ जमा करावी लागत आहेत.
दाऊदच्‍या घरचे सिग्नल्स वीक केले गेले
दाऊद ज्‍या घरात राहतो. तेथे लावण्‍यात आलेल्‍या सॅटेलाईट डिशचे सिग्‍नल वीक करण्‍यात आले आहेत. रात्री हे सिग्‍नल पूर्णपणे बंद करण्‍यात येतात. बेडरूममध्‍ये असलेले सर्व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांवर ISI चे बारीक लक्ष असते.
चार मंडळांमध्‍ये दाऊदला सुरक्षा
दाऊदच्‍या सुरक्षेचा गराडाही आता वाढवण्‍यात आला आहे. त्‍याच्‍या सुरक्षेसाठी एक मंडळ आणखी वाढवले आहे. त्‍यामुळे सध्‍या चार स्‍टेपमध्‍ये दाऊदला सुरक्षा पुरवण्‍यात येत आहे. या मंडळात ISI चे उच्‍च अधिकारीही आहेत. पाच लोकांची विशेष टीम सुरक्षेसाठी ठेवण्‍यात आल्‍याची माहिती आहे. पाकिस्‍तानमध्‍ये असलेल्‍या सुत्रांकडून माहिती मिळाली की, कराची आणि इस्‍लामाबादमध्‍ये दाऊदच्‍या घराच्‍या आसपास सुरक्षा वाढवण्‍यात आली आहे. याबाबत इंडोनेशियामध्‍ये राजनला विचारणा केल्‍यावर तो म्‍हणाला होता की, दाऊद पाकमध्‍येच आहे आणि त्‍याला ISI ने पूर्ण सुरक्षा दिली आहे.
राजन ३ दिवसांत भारतात
बाली | मागच्या अाठवड्यात इंडोनेशियाच्या बालीमध्ये मुसक्या आवळण्यात आलेला कुख्यात छोटा राजनला पुढील २-३ दिवसांत भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. इंटरपोलच्या आदेशावरून अटक करण्यात आलेल्या राजनची भारतीय पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. राजनला २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाहूहन परतताना बालीत पोलिसांनी अटक केली होती.
राजनच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय चमू इंडोनेशियात पोहोचला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी सोपस्कार सोमवारी त्यांनी सुरू केले. भारत प्रत्यार्पणास राजनच्या वकिलाने विरोध न केल्यास पुढील दोन दिवसांतच प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
उच्चायुक्तांची राजनशी अर्धा तास चर्चा
भारताचे जकार्तातील उच्चायुक्त संजीवकुमार अग्रवाल यांनी रविवारी छोटा राजनची तुरुंगात भेट घेतली. त्या वेळी भारतीय पोलिस अधिकारीही सोबत होते. त्या वेळी राजनने दहशतवादी डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच लपून बसल्याचे सांगितले. पाकिस्तानात त्याला लपण्यासाठी आयएसआय मदत करत असल्याचा दावाही राजनने या वेळी केला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, दाऊदची 14 सीक्रेट नावं, पाकिस्तान ते दुबईपर्यंत आहे वेगवेगळी ओळख​..