Home | Maharashtra | Mumbai | Pakistan dalit movement in the light of history

पुन:प्रकाशन, पाकिस्तानातील दलितांच्या चळवळीचा इतिहास उजेडात

अशोक अडसूळ | Update - Dec 02, 2016, 03:16 AM IST

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले चरित्र १९४६ मध्ये त्यांच्या हयातीतच प्रकाशित झाले, ते सुद्धा आजच्या पाकिस्तानाची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये. या ऐतिहासिक ग्रंथाचा कर्ता होता

 • Pakistan dalit movement in the light of history
  तानाजी खरावतेकर यांनी स्वातंत्र्यपूर्वी लेखन केलेल्या ग्रंथाचे मुखपृष्ठ.
  मुंबई - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले चरित्र १९४६ मध्ये त्यांच्या हयातीतच प्रकाशित झाले, ते सुद्धा आजच्या पाकिस्तानाची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये. या ऐतिहासिक ग्रंथाचा कर्ता होता तानाजी बाळाजी खरावतेकर हा कराचीतील मराठी युवक. बाबासाहेबांच्या आद्यचरित्राचा ठेवा काळाच्या उदरात गेली अनेक वर्षे गडप झाला होता. कराची- मुंबई मैत्री फोरमने बाबासाहेबांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून हा दुर्मिळ ग्रंथ पुन्हा वाचकांसमोर आणला अाहे. यानिमित्ताने कराचीतील दलित चळवळीचा इतिहास समाेर अाला अाहे.
  आॅब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन या मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेने तानाजी बाळाजी खरावतेकर लिखित डाॅक्टर आंबेडकर दुर्मिळ आद्यचरित्र नुकतेच पुन: प्रकाशित केले. फाऊंडेशनला हा ग्रंथ मुंबईतील सफाई कामगार क्षेत्रातील कार्यकर्ते रमेश हराळकर यांच्या संग्रही िमळाला. हराळकर यांना जातिअंताच्या चळवळीतील कार्यकर्ते प्रा. रमाकंात यादव यांनी ताे दिला होता. २०१० मध्ये यादव यांनी हा ग्रंथ पुन:प्रकाशित केला. मात्र त्याची एकही प्रत कोठेही उपलब्ध नव्हती. ‘१९३८ मध्ये कोकण पंचमहाल महार परिषद कणकवलीत भरली होती. त्या घटनेची कागदपत्रे मी संकलित करत होतो. त्या वेळी मला जुने हँडबिल िमळाले. त्यावर खरावतेकर लिखित बाबासाहेबांच्या चरित्राचा संदर्भ होता. मी या ग्रंथाचा शोध घेतला. कराचीतील ग्रंथालयाशी पत्रव्यवहारही केला. मात्र कोठेही प्रत मिळाली नाही. फाळणीनंतर पाकिस्तानातून मराठी कुटुंबे उल्हासनगरमध्ये स्थायिक झाल्याची माहिती मिळाली. तेथे तपास चालू केला. शेवटी खरावतेकर कुटुंबाशी स्नेह असलेले कुरंगकर हे स्थलांतरित कुटुंब सापडले. त्यांच्याकडे या ग्रंथाची पत्र सापडली,’ अशी माहिती यादव यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. २०१० मध्ये यादव यांनी या ग्रंथाच्या २०० प्रती छापल्या. त्यातील एकही प्रत आज उपलब्ध नाही. एका मराठी माणसाने बाबासाहेबांचे पहिल्यांदा चरित्र लिहिले, ते सुद्धा कराचीमध्ये. या ग्रंथाला ऐतिहासिक माेल आहे. म्हणून आम्ही सदर चरित्र पुन:प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, असे फोरमचे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
  बाबासाहेबांशी पत्रव्यवहार
  -तानाजी बाळाजी खरावतेकर यांचे वडील कोकणातील राजापूर जवळील खरावते गावचे. कामानिमित्त ते कराचीत स्थायिक झाले. तानाजी यांचे शिक्षण कराचीत झाले. १९४५ मध्ये इतिहासात ते बीए झाले. बाबासाहेबानंतरचे ते कोकणातील पहिले पदवीधर. बाबासाहेबांशी त्यांचा पत्रव्यहार होता. ते स्वत: पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील होते. १९४६ मध्ये त्यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्र प्रकाशित झाले. त्यानंतर पाच महिन्यानंतर त्यांचे मुंबईतील केईएम रुग्णालयात वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले.
  - ‘डाॅक्टर आंबेडकर’ या मूळ चरित्रावर रविकिरण छापखाना, असायलम रोड,रणछोड लाईन्स कराची- १ असा मुद्रकाचा पत्ता आहे. यातील भाषेची लेखनपद्धती जुन्या वळणाची आहे. ७० वर्षापूर्वी कराचीत मराठी ग्रंथव्यवहार किती सहज होता, याचा हे पुस्तक उत्तम पुरावा ठरते. हा ग्रंथ बाबासाहेबांच्या चरित्राचा आरंभबिंदू मानला जाताे.
  - ‘डाॅक्टर आंबेडकर’ या चरित्रात कराचीतील केसरकर बंधू या मराठी उद्योजकाची जाहिरात हे. मराठी भाषेचे आणि मराठी माणसाचे कराची शहराशी असलेले नाते यातून समजते. कराची नगरपालिकेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते काळू उमाजी माने हे सतत तीनवेळा निवडून आले होते, असे अनेक संदर्भ ९१ पानांच्या या छोटेखानी चरित्र ग्रंथात सापडतात. हा ग्रंथ ११ प्रकरणात विभागला असून बाबासाहेबांचे बालपण ते सार्वजनिक जीवन असा प्रवास यात रेखाटलेला आहे.

 • Pakistan dalit movement in the light of history
  तानाजी खरावतेकर

Trending