आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्‍टपासून पाकिस्तानच्‍या बाहेर जाऊ शकला नाही दाऊद इब्राहिम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/कराची - कुख्‍यात डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्‍तानात आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा यांच्‍या तीन भेटी झाल्‍यात. त्‍या दहशतवादाच्‍या मुद्दयावर चर्चा झाली. त्‍यामुळे पाकिस्‍तानवर दबाव वाढला आहे. परिणामी, दाऊद हा ऑगस्‍टपासून पाकिस्‍तानच्‍या बाहेर जावू शकला नाही. याला पाकिस्‍तान आणि मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे. त्‍यावर divyamarathi.com चा हा विशेष वृत्‍तांत...

मोदी-ओबामा यांच्‍या जवळीकतेचा परिणाम असा दिसला
- गत महिन्‍यांमध्‍ये अमेरिकेमध्‍ये यूएस अध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍यासोबत पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मीडिंग झाली. यामध्‍ये दहशतवादाच्‍या मुद्दयावर चर्चा झाली.
- शरीफ यांनी भारताविरुद्ध वातावरण निर्मिती करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍यांना ओबामा अडमिनिस्ट्रेशनकडून प्रतिसाद मिळाला नाही.
- भारताने दहशतवादाच्‍या मुद्दयावर दबाव आणला तर अमेरिकेने पाकिस्‍तान सरकारला यावर अटकाव करा, असे म्‍हटले. त्‍यामुळे पाकिस्तान सरकारने 26/11 मुंबई हल्‍ल्‍याचा सूत्रधार हाफिज सहीद याला अलर्ट राहण्‍याची सूचना दिली. हाफीज हा लश्कर-ए-तयैबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
कुठे जात असतो दाऊद?
दाऊद हा पाकिस्‍तानात नजर कैदेत आहे. त्‍यामुळे तो कराचीच्‍या बाहेर जाऊ शकत नाही. यापूर्वी तो बनावट पासपोर्टच्‍या आधारे मध्‍य आशियातील देश आणि यरोपात जात येत होता. पण, भारताकडून दबाव वाढल्‍याने आता त्‍याला पाकिस्‍तानातून बाहेर पडणे अवघड झाले आहे.
पाकला भीती, दाऊद नजरकैदेत
छोटा राजनला अटक केल्‍यानंतर आता पाकिस्‍तानने मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमला नजरबंद केले आहे. त्‍याच्‍याविषयी थोडीही माहिती भारतीय गुप्तचर संस्थांकडे पोहोचणार नाही याची विशेष काळजी पाककडून घेतली जात आहे. दाऊदवर 24 तास नजर ठेवण्‍यात येत आहे. पाकिस्तान आणि मुंबई पोलिसांच्‍या सुत्रांनी सोमवारी dainikbhaskar.com ला याविषयीची माहिती दिली. (संपूर्ण बातमी वाचण्‍यासाठी क्‍लीक करा...)
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, पाकिस्तानात दाऊद कुठे राहतो....