आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव यांना लगेचच फाशी देणार नाही, 3 अपिलाची संधी, 60 दिवसांत अपील शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद- भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लगेचच शिक्षा देणार नाही. ते अजूनही तीन मंचांवर या शिक्षेच्या विरोधात अपील करू शकतात. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहंमद आसिफ यांनी मंगळवारी आपल्या देशातील संसदेत हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, लष्करी न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यासाठी जाधव यांच्याकडे ६० दिवस आहेत. त्यानंतरही लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष यांच्यासमोर दया याचिका दाखल करू शकतात. 

अर्थात, जाणकारांच्या मते, पाकिस्तान लष्करी कायद्याच्या कलम १३१ नुसार लष्करी न्यायालयाच्या निकालाविरोधात ४० दिवसांत अपील करावे लागते. पाकिस्तानच्या माध्यमांनुसार, आसिफ यांनी संसदेला सांगितले की, ‘रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या कुलभूषण जाधव या नौदलातील अधिकाऱ्याला गेल्या वर्षी मार्चमध्ये पकडण्यात आले होते. न्यायालयात साडेतीन महिने सुनावणी झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला. जाधव यांच्यावर भारतासाठी हेरगिरी करणे, पाकिस्तानच्या अखंडत्वाविरोधात काम करणे आणि देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न यांसारखे आरोप सिद्ध झाले आहेत.’ 
 
लष्करी न्यायालयाकडून शिक्षा झालेल्या तालिबानी दहशतवाद्यांना फाशी : पाकिस्तानने दोन तालिबानी दहशतवाद्यांना फासावर लटकावले आहे. वादग्रस्त लष्करी न्यायालयातर्फे सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची मंगळवारी अंमलबजावणी झाली. पेशावर दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापित लष्करी न्यायालयांची मान्यता जानेवारीत संपली होती, पण गेल्या महिन्यातच त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

निकालाची प्रत मागा : जेठमलानी
ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या मते, भारताने आधी जाधव यांच्या विरोधात लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या निकालाची प्रत मागायला हवी. त्यांना कोणत्या आधारावर फाशी दिली हे त्याद्वारे स्पष्ट होईल. त्यावरूनच शिक्षा योग्य आहे की अयोग्य हे आपल्याला कळू शकेल. शिक्षेला ठोस आधार मिळू शकला नाही तर भारताची केस आणखी मजबूत होईल.

पाकिस्तानची कहाणी रहस्यमय आणि अनिश्चिततेने भरलेली आहे. तो भारताला कठोर संदेश देऊ इच्छितो. जागतिक मंचावर स्वत:ला वेगळे पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांच्या विरोधात पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. जाधव यांचा वापर करून आपण भारताकडून काही महत्त्वाच्या गोष्टी कबूल करून घेऊ, अशी पाकची इच्छा असेल.  
- मायकेल कुगेलमॅन, वुड्रो विल्सन केंद्रात दक्षिण आशियाचे उपसंचालक

जाधव यांच्या प्रकरणात अनेक गंभीर अनियमितता आहेत. त्यांना वकील दिला नाही. कोर्ट मार्शलची प्रक्रियाही गोपनीय ठेवली. जाधव यांच्या प्रकरणात तर पाकिस्तानने एवढी घाई दाखवली, पण मुंबई हल्ल्यातील आरोपींवरील खटला मात्र पुढे जात नाही.  
- अॅलिया आयर्स, परराष्ट्र मंत्रालयाच्या माजी अधिकारी.

शिक्षेचा आधार सांगितलेले पुरावे अत्यंत कमजोर  
पाकच्या कहाणीवर विश्वास ठेवता येत नाही. दहशतवादाच्या आधारावर भारत पाकला मुत्सद्देगिरीने वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ही शिक्षा त्याला प्रत्युत्तर आहे.  - भारत गोपालस्वामी, अटलांटिक परिषदेच्या दक्षिण आशिया केंद्राचे संचालक

पाकचे हे वकील कुलभूषण जाधव यांना वाचवू शकतात
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जाधव यांना वाचवण्यासाठी सर्वोत्तम वकील देऊ, असे म्हटले आहे. पण पाकिस्तानच्या शक्तिशाली लष्कराच्या विरोधात कोणी जाधव यांचे वकीलपत्र घेईल का, याबद्दल भारतीय तज्ज्ञांत साशंकता आहे. अर्थात, पाकिस्तानमध्येही काही असे वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, जे जाधव यांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.  
१ अस्मा जहांगीर : प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेच्या प्रमुख राहिलेल्या आहेत.  
२ अन्सार बर्नी : प्रसिद्ध वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ता आहेत. मंत्रीही होते. कैद्यांच्या हक्कांसाठी काम करतात. फाशीच्या शिक्षेला जोरदार विरोध आहे.  
३ जिब्रान नासीर : युवा वकील आहेत. पेशावर हल्ल्याच्या विरोधात मौलवी आणि धार्मिक दहशतवाद्यांच्या विरोधात खटले दाखल केल्याने चर्चेत आले होते.  
४ एजाज अहसान : सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबित झालेले तत्कालीन न्यायमूर्ती इफ्तिखार चौधरींच्या समर्थनार्थ वकिलांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मनसेने पाकिस्तानी ध्वज जाळून केला निषेध.... आणि कुलभूषण यांचा कथित व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...