आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: हायपॉइंट इमारत: पनवेलमध्ये राहणारे हुसेन पटेल हेच कथित हेर कुलभूषण जाधव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानातील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चा कथित अधिकारी कुलभूषण जाधव यांचे काही काळ मुंबईजवळच्या पनवेल येथे वास्तव्य असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पनवेलच्या तक्का परिसरातील ‘हायपॉइंट’ या इमारतीत साधारण दहा वर्षांपूर्वी हुसेन पटेल नावाची एक व्यक्ती राहत होती. कदाचित ती व्यक्तीच कुलभूषण जाधव असावी, अशी चर्चा सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

पनवेल रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मुंबई- गोवा हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हाय पॉइंट या इमारतीच्या सी विंगमधील रूम नंबर हा फ्लॅट सध्या चर्चेचा विषय झाला आहे. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील काेर्टाने फाशीची शिक्षा दिलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आईच्या नावे हा फ्लॅट असून १० वर्षांपूर्वी या ठिकाणी हुसेन पटेल ही व्यक्ती राहात होती.

हायपॉइंट या सोसायटीचे सचिव सचिन शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार, तो फ्लॅट अवंती जाधव यांच्या नावावर असून 1991 मध्ये तो त्यांनी खरेदी केल्याची नोंद सोसायटीच्या दप्तरी आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी सन 2006  मध्ये या घरात हुसेन पटेल नावाचा एक भाडेकरू राहत होता. आपण शिपिंग व्यवसायात असल्याची माहिती पटेल यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी जरी हा फ्लॅट भाड्याने घेतला असला तरीही ते या घरात फारसे वास्तव्य करत नसत. महिनाभरातून एखादी फेरी ते मारत असत, अशी माहिती सचिव शिंदे यांनी दिली. एकदा पासपोर्टसाठी आवश्यक असलेल्या रहिवासी दाखल्याची मागणी पटेल यांनी सोसायटीकडे केली होती. मात्र, त्यांच्याकडे भाडेकराराची प्रत नसल्याने सुरुवातीला आम्ही त्यांना दाखला देण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मालकांच्या नावाचे नाहरकत प्रमाणपत्र आणून दिल्यावर सोसायटीने त्यांना वास्तव्याचे प्रमाणपत्र दिल्याचे शिंदे म्हणाले.

शु्ल्कमात्र नियमित
सध्याहे घर बंद असून गेल्या दहा वर्षांपासून इथे कोणीही राहत नाही. मात्र, दरवर्षी त्या घराच्या देखरेख शुल्कापोटी एक धनादेश सोसायटीला प्राप्त होत आहे. या वर्षीचा धनादेश हा जुलै महिन्यातच प्राप्त झाला असून विरार येथील पत्त्यावरून तो पाठवला गेला होता, असेही शिंदे यांनी सांगितले. पनवेलच्या याच इमारतीत जाधव यांचे वास्तव असल्याचे सांगितले जाते.

जाधव यांच्या पवईतील घराबाहेर बंदोबस्त
जाधवयांचे मुंबईतील पवई परिसरातील हिरानंदानी परिसरात घर आहे. हिरानंदानी गार्डनमधील सिल्व्हर ओक या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर 502 क्रमांकाचा फ्लॅट त्यांच्या मालकीचा असून तिथे त्यांचे आईवडील राहतात. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेबद्दल बातम्या सुरू होताच मुंबई पोलिसांनी या निवासस्थानी बंदोबस्त तैनात केला. जाधव यांचे वडील सुधीर जाधव हे मुंबई पोलिस दलातून सहायक पोलिस आयुक्त या पदावरून 2002 मध्ये निवृत्त झाले असून त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क होऊ शकला नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...
> सांगलीच्या कुलभूषण जाधवांना हेर सांगत पाकने सुनावली मृत्युदंडाची शिक्षा, ही हत्या ठरेल- भारत

> व्हिडिओ...कुलभूषण जाधव यांच्या खुलाशावर उपस्थित करण्‍यात आला होता सवाल...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...