आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Police Finally Admits: We Got Mumbai Romeo Who Came Looking For Pashtun Girlfriend

बेपत्ता हमीदचा ठावठिकाणा लागला: भारतीय \'वीर\' पाकिस्तानी \'झारा\'शिवायच परतणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील वर्सोवा येथे राहणारा हमीद निहाल अन्सारी हा उच्चशिक्षित तरुण गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानमध्ये बेपत्ता होता त्याचा ठावठिकाणा लागला असून तो पाकिस्तानमध्ये असल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. पाकिस्तान पोलिसांनी पेशावर हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 10 नोव्हेंबर 2012 रोजी हमीदला ताब्यात घेऊन गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हमीद पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट झाले असून लवकरच मायदेशात परतेल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, हमीद ज्या आपल्या प्रेयसीसाठी गेला होता तिचे आता लग्न झाले असल्याने हा भारतीय 'वीर' आता पाकिस्तानी 'झारा'शिवाय परतणार हे स्पष्ट झाले आहे.
हमीद हा फौजिया आणि निहाल अहमद अन्सारी या उच्चविद्याविभूषित जोडप्याचा मुलगा. फौजिया प्राध्यापक तर निहाल अहमद बँकेत अधिकारी. हमीद आयटी इंजिनीअर, ऑपरेशन्समध्ये एमबीए पूर्ण केलेला हुशार मुलगा. जुहू रोटरॅक्ट क्लबचा प्रेसिडेंटही. नोकरीच्या शोधात जातो, म्हणून 4 नोव्हेंबर, 2012ला तो मुंबईहून काबूलला रवाना झाला. 15 नोव्हेंबरला परत येऊन तो 16 नोव्हेंबरला एका कॉलेजात लेक्चरर म्हणून रुजू होणार होता. तो 10 नोव्हेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून कुटुंबाच्या संपर्कातही होता.
हमीद परत न आल्याने अस्वस्थ झालेल्या पालकांनी त्याचे फेसबुक अकाऊंट तपासले तेव्हा तो पाकिस्तानातील मुलीच्या संपर्कात असल्याचे ध्यानात आले. त्याच्या ऑनलाइन संवादांवरून बरीच माहिती हाती आली. 2012च्या सुरुवातीला ऑनलाइन गप्पा मारताना तो पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट शहरात बीएडचे शिक्षण घेणाऱ्या नादिया खान या मुलीच्या प्रेमात पडला. हा पाकिस्तानातील टोळीवाल्यांचे आणि तालिबानचे प्राबल्य असलेला अतिशय संवेदनशील भाग.
पाकिस्तानात जाऊन तिला भेटण्यासाठी व्हिसा मिळणे अवघड असल्याचे ध्यानात आल्यावर हमीदने पाकिस्तान सरकारच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉ. शाझिया खान, कोहाटमधील पत्रकार अताउर रहमान आणि अन्य काही जणांशी ऑनलाइन मैत्री केली. या लोकांनी हमीदला काबूलमार्गे पाकिस्तानात शिरकाव करण्याचा सल्ला दिला आणि तो मानून हमीद नोकरीचे खोटे कारण सांगत नादियाला भेटण्यासाठी निघाला.
कोहाटमध्ये गेल्यावर तो पत्रकार अताफर रहमान यांच्याकडे राहिला. मात्र, काही दिवसातच त्याला पोलिसांनी पकडून नेले. त्यानंतर तो बेपत्ता होता. त्यानंतर अन्सारी दाम्पंत्याने मुलाच्या शोधासाठी भारत आणि पाकिस्तान सरकारकडे संपर्क साधला. मात्र, फारसे काही सकारात्मक घडत नव्हते. याबाबत मुंबईतील तत्कालीन खासदार गुरुदास कामत आणि मोदी सरकार आल्यानंतर शिवसेनेचे मंत्री अनंत गिते यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तान पोलिसांनी हमीद गुप्तचर संघटनांच्या ताब्यात असल्याचे मान्य केले आहे.
नादियाचा झाला निकाह- नादियाच्या प्रेमासाठी हमीद जीवावरचा धोका पत्करून सीमा ओलांडून गेला, तिचा मात्र या वर्षभरात निकाह झाला आहे. आपापसातील मारामारीत तिच्या भावाकडून एका कुटुंबातील व्यक्तीची हत्या झाली होती. याचा बदला म्हणून तिथल्या टोळीच्या 'वानी' या प्रथेनुसार तिला त्या कुटुंबातील व्यक्तीशी विवाह करणे बंधनकारक होते. त्यामुळे हमीद जेव्हा भारतात येईल तेव्हा तो नादियाशिवायच भारतात येईल.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, हामिदने नादियापर्यंत पोहचण्यासाठी काय काय केले...