आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Actress Mahira Khan Makes Fun Of Shivsena

पाकिस्तानी अभिनेत्रीकडून शिवसेनेची खिल्ली!, शाहरूखला ठरणार डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी कलाकारांच्या देशात काम करण्याला शिवसेनेचा विरोध माहीत असतानाही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने एका छायाचित्रातून शिवसेनेची खिल्ली उडवली.
माहिराने पाकिस्तानी दिग्दर्शक असीम रझा याच्यासोबत एक फोटो काढला आहे. यात रजाने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा पेहराव केला असून माहिराने त्याच्यासोबत पोझ दिली आहे. छायाचित्रात असीमने ‘माहिरा को बाहर निकालो’ असा फलक हाती धरला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे. दरम्यान, शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत फवाद खान आणि माहिराला महाराष्ट्रात काम करू देणार नाही, असा इशारा दिला होता.
शाहरुखची डोकेदुखी
माहिरा खान ही अभिनेता शाहरूख खानच्या ‘रईस’ या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी शिवसेना काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.