आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेपूढे झुकले B4U, नाही रिलीज होणार पाकिस्तानी चित्रपट \'बिन रोये\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिन रोये' चित्रपटाचे पोस्टर आणि B4U चॅनलचे हमीपत्र
B4Uचॅनलने ह्या हमी पत्रासह ‘बिन रोये’ हा पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित न करण्याचे आश्वासन दिले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर ह्यांना हे पत्र B4Uचॅनलने पाठवले आहे.
हुमायन सईद, महिरा खान , अमिना खान आणि जावेद शेख स्टारर हा चित्रपट B4U चॅनेल भारतात प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र कोणताही पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करू दिला जाणार नाही. असा पवित्रा सुरूवातीपासूनच मनसेने घेतला आहे. आणि मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर ह्यांनी ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला होता.
चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला होता. शेवटी B4Uचॅनलला मनसेसमोर झुकावे लागले आहे. आणि हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे हमीपत्र त्यांनी मनसेला पाठवले आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, B4U चॅनेलचा माफीनामा