आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी गायिकेने म्हटले मराठी चित्रपटातील गाणे; व्हिडिओ व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाजियाने आपल्या फेसबुक पेजवरुन मराठी गाणे शेअर केले आहे. - Divya Marathi
नाजियाने आपल्या फेसबुक पेजवरुन मराठी गाणे शेअर केले आहे.
मुंबई- एका पाकिस्तानी गायिकेने म्हटलेल्या मराठी चित्रपटातील गाण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुळच्या युएईतील असलेल्या या गायिकेचे नाव नाजिया आमिन मोहंमद आहे. तिने आपल्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. नाजियाने  म्हटले आहे की संगीताची कोणतीही सीमा नसते. 

सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते नाजिया...
- मुळची युएईची असणारी नाजिया एक प्रसिध्द गायिका आहे. ती सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. नाजियाने देशात आणि परदेशात राहणाऱ्या आपल्या मराठी मित्र-मैत्रिणींसाठी जोगवा चित्रपटातील 'जीव रंगला' या गाण्याचा व्हिडिओ बनवला आणि फेसबुकवर अपलोड केला आहे.
- हा व्हिडिओ एकाच दिवसात 4 हजार लोकांनी पाहिला आहे. गाजियाने संगीतकार अजय-अतुल यांचेही कौतुक केले आहे. 
 
काय आहे जोगवा या चित्रपटाची कथा
- जोगवा या 2009 मध्ये आलेल्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यांनी अभिनय केलला आहे.
- देवदासी या प्रथेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात देवदासी होण्याची प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे शोषण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
- या चित्रपटातील अजय-अतुल यांनी संगीत दिलेले 'जीव रंगला' हे गाजले होते. 
बातम्या आणखी आहेत...