आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Team Come In Mumbai For 26 11 Attack Inquary

26/11 हल्ल्याची चौकशीसाठी पाकिस्‍तानचे पथक मुंबईत दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचाही संबंध जोडला गेल्याने या प्रकरणाची त्यांच्या देशातही सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही साक्षीदारांचे जाबजबाब घेण्यासाठी पाकिस्तानातील आठ जणांचे न्यायालयीन पथक मंगळवारी मुंबईत दाखल झाले. अतिरेकी कसाबचा कबुलीजबाब घेणारे किल्ला कोर्टातील न्यायाधीश, सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही जबाब हे पथक नोंदविणार आहे. या हल्ल्याचा तपास करणारे गुन्हे शाखेचे अधिकारी रमेश महाले, कसाबवर उपचार करणारे जे.जे. रुग्णालयातील दोन डॉक्टर तसेच कसाब अल्पवयीन नव्हता हे सिद्ध करणा-या डॉक्टरांचाही जबाब पाकिस्तानातील पथक घेणार आहे.


यापूर्वीही एकदा पाकिस्तानचे न्यायालयीन पथक मुंबईत येऊन चौकशी करून गेले होते. त्यांचा हा दुसरा दौरा आहे. दरम्यान, मंगळवारी हे पथक मुंबईत दाखल झाले व येथील न्यायालयात जाऊन त्यांनी दिवसभर कामकाज केले. या पथकाच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोर्टाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.