इस्लामाबाद / मुंबई- भारतातील उजव्या विचारसरणीची संघटना असलेल्या शिवसेनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे व त्यांच्यावर बंदी आणावी अशी मागणी पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या विधानसभेने युनोकडे पत्राद्वारे केली आली आहे. शिवसेनेमुळे मुस्लिमांची सुरक्षितता धोक्यात आली असून इतर धर्मीयांनाही धोका निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघा (युनो)ने याची गंभीर घ्यावी आणि शिवसेनेला अतिरेकी संघटना म्हणून घोषित करून बंदी आणावी, अशी मागणी पाकिस्तान पीपल पार्टीचे नेते आणि कायदामंत्री फैज मलिक यांनी केली आहे.
भारत-पाक क्रिकेट सामने खेळविण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शहरयार खान मुंबईत आले असता त्यांना शिवसेनेने जोरदार विरोध केला. भारत-पाकिस्तान यांच्यात आठ वर्षानंतर पुन्हा क्रिकेट संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना शिवसेनेने खीळ घातली आहे. सोमवारी सकाळी शेकडो शिवसैनिकांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील बीसीसीआयच्या मुख्यालयात घुसून थेट शशांक मनोहर यांच्या केबिनमध्ये घुसत 'मुंबईत पाकड्यांसोबत बैठक घ्याल तर याद राखा, गाठ शिवसेनेशी आहे' अशी धमकी दिल्यानंतर ही बैठक रद्द करावी लागली होती. त्याआधी पाकिस्तानी गायक गुलाम अली खान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्याविरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे पाकिस्तानात शिवसेनेविरोधात वातावरण तापले आहे. त्यातच मुंबईत कालची घटना घडली. शिवसेनेच्या या आंदोलनाचे पडसाद तिकडे पाकिस्तानातही उमटले.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेने शिवसेनेविरोधात सोमवारच्या घटनेनंतर ठराव आणला आणि संयुक्त राष्ट्रसंघाने शिवसेनेवर बंदी घालावी अशी मागणी केली. पाकिस्तानविरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचा निषेध म्हणून पंजाब प्रांतासह पाकिस्तानातही शिवसेनेविरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेनेमुळे मुस्लिमांची सुरक्षितता धोक्यात आली असून इतर धर्मीयांनाही धोका निर्माण झाला आहे अशी भूमिका पाकिस्तान पीपल पार्टीचे नेते आणि कायदामंत्री फैज मलिक यांनी विधानसभेत मांडली. संयुक्त राष्ट्रसंघाने याची गंभीर घ्यावी आणि शिवसेनेला अतिरेकी संघटना म्हणून घोषित करून बंदी आणावी असा ठराव यावेळी करण्यात आला. विधानसभेने तो एकमताने मंजूर केला.
पुढे वाचा, अरूण जेटलींनीही शिवसेनेला फटकारले...