आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर तरुणी बुद्धिमान तरुणांसाठी पोळ्या लाटतील - पलाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आयआयटी’मधून बाहेर पडणार्‍या तरुणांना जगातील सर्वात सुंदर मुली मिळतील, ज्या त्यांच्यासाठी पोळ्या लाटतील, असे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य युफोरिया बँडचा गायक पलाश सेनने केले आहे. आयआयटीमध्ये मूड इंडिगो फेस्टिव्हल सुरू आहे. त्या वेळी त्याने तिथे उपस्थित असलेल्या तरुणांना विचारले की, इथे सुंदर मुली आहेत का, त्यावर त्याला काही तरुणांनी नाही असे उत्तर दिले. त्यावर त्याने वरील वादग्रस्त टिप्पणी केली आहे. दरम्यान, अर्पिता विश्वास या विद्यार्थिनीने आपल्या ब्लॉगमधून पलाशच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. महिला केवळ सौंदर्यासाठी आणि पुरुष बुद्धिमत्तेसाठी असतात, असेही त्याने म्हटल्याचे अर्पिताने म्हटले आहे. दरम्यान, अनेक महिला संघटनांनी पलाशच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून त्याने माफी मागावी, अशी मागणी केली.