आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Palghar Assembly Byelection, Amit Ghoda Is Shivsena's Candidature

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालघर पोटनिवडणूक: शिवसेनेची घोडा यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनामुळे होणार्‍या आगामी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी घोषित केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज ही घोषणा केली. 27 जून रोजी ही निवडणूक होत आहे. कृष्णा घोडा यांचे 24 मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी पालघर येथे सर्वपक्षीय शोकसभा झाली. यावेळी सुभाष देसाई यांनी अमित यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, पालकमंत्री विष्णू सावरा, माजी मंत्री राजेंद्र गावीत यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.