आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर नगरपालिकेवर शिवसेनेचा मोठा विजय, काँग्रेस- बविआचे पानिपत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या पालघर नगर परिषदेवर शिवसेनेने मोठा विजय मिळविला आहे. 28 पैकी 17 जागा जिंकून शिवसेनेने निर्विवादपणे बहुमत मिळवत स्वबळावर सत्ता काबीज केली. या निवडणुकीत कॉंग्रेससह बहुजन विकास आघाडीचे पानिपत झाले तर राष्ट्रवादीला तब्बल 10 जागा जिंकता आल्या.
पालघर नगर परिषदेच्या सात प्रभागांतील 28 जागांसाठी रविवारी मतदान झाले. अत्यंत अटीतटीच्या पंचरंगी झालेल्या लढतीत शिवसेनेचे 27, राष्ट्रवादीचे 28, कॉंगे्रसचे 24, बहुजन विकास आघाडीची 27, रिपाइं व भाजप प्रत्येकी 1 व अपक्ष मिळून एकूण 122 उमेदवार रिंगणात होते.
कॉंग्रेरस-राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. पण सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर दोन्ही कॉंग्रेसला पराभवाचा धक्का बसला. कॉंग्रेसच्या उज्ज्वला काळे एकमेव उमेदवार निवडणूक आल्या. बहुजन विकास आघाडीने खातेही उघडले नाही. राष्ट्रवादीचे श्‍वेता पाटील, मकरंद पाटील, रेश्मा म्हात्रे, बिंदिया दीक्षित, प्रवीण मोरे, सुरेश दुबळा, प्रीतम राऊत, नंदकुमार पाटील, सचिन पाटील, रवी म्हात्रे विजयी झाले.
पक्षीय बलाबल
एकूण जागा : 28
शिवसेना : 17
राष्ट्रवादी : 10
कॉंग्रेस : 1
बहुजन विकास आघाडी : 0
भाजप : 0
आरपीआय : 0
अपक्ष : 0