आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pali Hill Residents Led By Actor Rishi Kapoor Hit The Streets To Protest The Bmc

PHOTOS: हॉकर्स झोनविरोधात ऋषी कपूरच्या नेतृत्त्वात बॉलिवूडकरांचे आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील पाली हिल परिसरात हॉकर्स झोन्सला परवानगी दिल्याच्या निर्णयाविरोधात प्रदर्शनात सहभागी झालेले ऋषी कपूर आणि नीलम कोठारी. - Divya Marathi
मुंबईतील पाली हिल परिसरात हॉकर्स झोन्सला परवानगी दिल्याच्या निर्णयाविरोधात प्रदर्शनात सहभागी झालेले ऋषी कपूर आणि नीलम कोठारी.
मुंबई- मुंबईतील पाली हिल या पॉश भागात लावले जात हॉकर्स झोन्स (रस्त्यावरील ठेले, दुकाने) विरोधात रविवारी बॉलिवूडकर मंडळींनी जोरदार व खुलेआम विरोध केला. मुंबईतील पॉश परिसर असलेल्या पाली हिल परिसरात अनेक बॉलिवूड सितारे राहतात मात्र त्यांनी प्रथमच हॉकर्स झोनविरोधात रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केले.
विरोध प्रदर्शनाचे नेतृत्त्व करणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी सांगितले की, जर मुंबई महापालिकेला हॉकर्सदारांचे प्रेम असते तर त्यांनी सर्वप्रथम कुंबाला हिल, मलबार हिल यासारख्या परिसरातही हॉकर्सना परवानगी दिली असती. आपल्याला माहित असेलच की कुंबाला व मलबार हिल परिसरात बहुतांश राजकीय मंडळी राहतात. पाली हिलमधील रस्ते खूपच अरूंद आहेत त्यातच येथे दोन्ही बाजूंनी लोक कार पार्क करतात. अशावेळी येथे जर हॉकर्स झोन झाला तर काय परिस्थिती तयार होईल याचा अंदाज तुम्ही-आम्ही बांधू शकतो असे सांगत हॉकर्स झोनबाबत मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला.
मुंबई महापालिकेने पाली हिल भागात हॉकर्स झोन्स करण्याचा घेतलेला निर्णय बॉलिवूड मंडळीला पटलेला नाही. त्यांचे म्हणणे आहे हा भाग गर्दीचा आहे व येथे हॉकिंग झोन्स बनवणे योग्य ठरणार नाही.
रस्त्यावर उतरले अनेक सेलिब्रेटी-
बीएमसीच्या प्रस्तावित हॉकर्स झोन्सच्या निर्णयाविरोधात प्रदर्शन आंदोलनात ऋषी कपूर यांच्याशिवाय म्यूझिक कंपोजर विशाल डडलानी, फिल्म निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा, अभिनेता इमरान हाश्मी आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यासारखी सेलिब्रेटी मंडळी रस्त्यावर उतरली होती. या प्रदर्शन आंदोलनात भाजपच्या एका आमदारानेही सहभाग घेतला होता. 2004 पासून या परिसरात राहणा-या विशाल डडलानीचे म्हणणे आहे की, आम्ही स्वच्छ व सुंदर परिसर ठेवू इच्छित आहे. मुंबई महापालिकेने असे काही करण्यापूर्वी सिटी प्लॅनर यांच्याशी विचार-विमर्श करायला हवा होता.
पुढे पाहा, कोणी कोणी प्रदर्शनात घेतला सहभाग...