आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती निवडणूक: बीडमधील पराभव पंकजा मुंडेंच्‍या जिव्‍हारी, मुख्‍यमंत्र्याकंडे राजीनामा सोपवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्‍यातील 283 पंचायत समित्‍या, 10 महापालिका आणि 25 जिल्‍हा परिषदांचाचे  निकाल स्‍पष्‍ट झाले आहेत. नगरपालिकेप्रमाणेच भाजपनेच या निकालांमध्‍ये बाजी मारल्‍याचे राज्‍यभरातील चित्र आहे. जळगाव आणि नाशिक पंचायत समिती निवडणुकीमध्‍ये भाजपने निर्विवाद यश मिळविले आहे.  
 
जळगावमधील बोदवडा, यावल, भुसावळ, रावेर आणि मुक्‍ताईनगर पंचायत समित्‍यांमध्‍ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्‍या आहेत. नाशिकमधील 12 जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्‍यानुसार 8 जागांवर भाजप तर शिवसेनेने 4 जागांवर विजय मिळवला आहे. 
 
राज्‍यभरातील पंचायत समिती आणि जिल्‍हा परिषदांमध्‍ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्‍येच टक्‍कर पाहायला मिळाली. नांदेड, अमरावती येथेही भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातच मुख्‍य लढत झाली. काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीला आपल्‍या पूर्वीच्‍या जागाही राखता आल्‍या नाहीत. प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या संभाजी ब्रिगेड या पक्षाने नांदेडमध्‍ये एक जागा जिंकून पंचायत समितीमध्‍ये प्रवेश केला आहे. 
 
बीडमध्‍ये पंकजा मुंडेंना धक्का, राजीनामा देणार  
बीडमधील जिल्‍हा परिषद आणि पंचायत समित्‍यांच्‍या निवडणुका पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्‍ठेच्‍या केल्‍या होत्‍या. मात्र दोन्‍ही ठिकाणी पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. बीड जिल्‍हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला आहे तर परळी आणि अंबाजोगाई या पूर्वी भाजपकडे असणाऱ्या पंचायत समित्‍यादेखील भाजपने स्‍वत:कडे खेचून आणल्‍या आहेत. या पराभवाची जबाबदारी स्‍वीकारत पंकजा मुंडे यांनी आपण राजीनामा देणार असल्‍याचे जाहीर केले आहे. 
 
LIVE UPDATE:
 
सिन्नर पंचायत समिती निकाल (नाशिक)
विजयी उमेदवार
- नायगांव-संग्राम कातकाडे (शिवसेना)
- माळेगांव-भगवान पथवे (शिवसेना)
- मुसळगाव- सुमन बर्डे (शिवसेना)
- गुळवंच- रोहिणी कांगणे (शिवसेना)
- देवपूर- विजय गडाख (भाजपा)
- भरतपूर- योगिता कांदळकर (भाजपा
- नांदूरशिंगोटे- शोभा बर्क़े (शिवसेना)
- पांगरी- रविंद्र पगार(भाजपा)
- चास-जगन्नाथ भाबड (शिवसेना)
- डुबेरे- संगीता पावसे (शिवसेना)
- ठाणगाव- वेणूबाई डावरे (शिवसेना)
- शिवडे- तातू जगताप (भाजपा)
 
एकूण 
शिवसेना-08
भाजपा-04
 
- नांदेडमध्‍ये संभाजी ब्रिगेडने खाते उघडले. 
- अर्धापूर पंचाय‍त समिती गणामध्‍ये एका उमेदवाराचा विजय . 
 
जळगाव 
- बोदवड तालुका (एकूण जागा 4 )
सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. 

- यावल तालुका (एकूण जागा 10)
-  ५ जागांवर भाजप विजयी.   
- 4 जागा काँग्रेसने जिंकल्‍या, 1 जागेवर अपक्ष विजयी. 

- भुसावळ तालुका (एकूण जागा 6)
- 4 जागांवर भाजप विजयी, राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा एका जागेवर विजय. 

- रावेर तालुका (एकूण जागा 12)
- भाजपने सर्वाधिक 8 जागेवर कमळ फुलविले आहे.  
- राष्‍ट्रवादीचा दोन जागांवर विजय तर सेना व काँग्रेसने प्रत्‍येकी एका जागेवर विजय मिळविला. 
 
- मुक्ताईनगर तालुका (एकूण  ८ जागा) अमरावती 
- भाजपने 6 जागा मिळविल्‍या, सेना व राष्‍ट्रवादीचा प्रत्‍येकी एका जागेवर विजय. 
 
हिवरखेड पंचायत समिती  (अमरावती) 
- भाजपच्‍या सौ.माया प्रकाश वानखड़े विजयी.  2678 मते मिळाली. 
- कांग्रेसच्‍या सौ.संगीता संजय दंडाळे पराभूत (2565 मते), 113 मताने भाजप उमेदवार विजयी. 
- अमरावतीच्‍या साऊर पंचायत समिती गणामध्‍ये काँग्रेस विजयी.  
 
-  आंबोली पंचायत समिती -  भाजप उमेदवार मंगला परसराम नन्नावरे विजयी. 
 
-  भुसावळ तालुक्‍यातील दोन जागांपैकी 1 जागेवर भाजप व दुसऱ्या ठिकाणी राष्‍ट्रवादी काँग्रेस आघाडीवर. 
 
 
नांदेड जिल्‍ह्यातील पंचायत समितीच्‍या मतमोजणीमध्‍ये हे उमेदवार आहेत आघाडीवर, निकाल काही क्षणांतच.. 
अ.क्र तालुका गट  उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव
1 बिलोली आरळी  लक्ष्मण  ठक्करवाड भाजपा
2 देगलुर खानापुर अनुराधा पाटील काँग्रेस
3 लोहा सोनखेड अंकीता मोरे काँग्रेस
4 नांदेड वाडी शिला निखाते      काँग्रेस
5 भोकर पाळज दिवाकर रेड्डी  भाजपा
6 कंधार बहाद्दरपुरा संध्याताई धोंडगे भाजपा
7 उमरी गोरठा संगीता जाधव राष्ट्रवादी
8 किनवट उमरी सुनयना जाधव राष्ट्रवादी
9 लोहा वडेपुरी प्रणीता ताई देवरे शिवसेना
10 नायगांव   बरबडा विजयश्री कमतेवाड काँग्रेस
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...