आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचा 'मोठेपणा': कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पुजेचा मान खडसेंना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दरवर्षी पंढरपूरात भरणा-या कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रखूमाईच्या पुजेचा मान यंदा राज्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आला आहे.
मागील 15 वर्षापासून कार्तिकी एकादशीची पुजा राज्याचे उपमुख्यमंत्री करीत आले आहेत. यंदा मात्र फक्त भाजपचेच सरकार आल्याने व उपमुख्यमंत्रीपद नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनाचे मोठेपण दाखवत मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ मंत्री असलेले खडसेंना हा मान दिला आहे. येत्या 3 नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापुजा होत आहे. ही पुजा खडसे सपत्निक करतील.