आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pandit Jasraj To Get Maharashtra Government's Top Music Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंडित जसराज यांना भीमसेन जोशी पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारतर्फे दिला जाणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार यंदा पद्मविभूषण पं. जसराज यांना बुधवारी जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनाही गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 5 लाख रुपये, मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

गायकीचे प्राथमिक धडे वडिलांकडून घेतल्यानंतर थोरले बंधू मेवाती घराण्याचे महाराज जयवंतसिंह वाघेला आणि उस्ताद गुलाम कादरखाँ यांच्याकडून जसराज यांनी गायनाचे उच्च शिक्षण घेतले. आग्रा घराण्याचे स्वामी वल्लभदास यांच्याकडूनही त्यांनी धडे गिरवले. संगीत नाट्य अकादमी, लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र गौरवसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत ताकदीचे संगीतकार दबदबा असलेल्या अशोक पत्की यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘सावली’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’, ‘अंतर्नाद’ अशा चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार, रेडिओवरील गाजलेल्या जिंगल्स, पी. सावळाराम पुरस्कार त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.