आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकज भुजबळ यांना १० जूनपर्यंत हायकाेर्टाचा दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदनप्रकरणी मनी लाॅडरिंगचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे अामदार पंकज भुजबळ, असिफ बलवा, विनाेद गाेयंका यांनी अजामीनपात्र वाॅरंटला उच्च न्यायालयात अाव्हान दिले हाेते. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या सर्वांना १० जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले अाहे. तसेच वाॅरंटवर स्थगितीसाठी द्विसदस्यीय खंडपीठासमाेर जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच खासदार संजय काकडे, प्रवीण जैन, संजीव जैन, चंद्रशेखर सारडा, जगदीश पुराेहित यांच्यासह ११ जणांच्या अटकेला न्यायालयाने १ जुलैपर्यंत संरक्षण दिले अाहे. तसेच काकडे यांना व्यावसायिक कामासाठी हैदराबादला जाण्याची परवानगीही दिली अाहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह मनी लाॅडरिंग प्रकरणात सहभागी असल्याचा या सर्वांवर अाराेप अाहे.
बातम्या आणखी आहेत...