आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaj Bhujbal Start ED Investigation For Maharashtra Sadan Scam

पंकज भुजबळांची ED कडून चौकशी सुरु; समीर यांना 14 दिवसांची कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाने (ED) चौकशी सुरु केली आहे. पंकज भुजबळ सकाळी सव्वा दहा वाजेच्यादरम्यान इडीच्या कार्यालयात पोहोचले.

दुसरीकडे, छगन भुजबळ हे देखील मायदेशी परत येत आहेत. त्यामुळे त्यांना देखील चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक आठवड्यापासून भुजबळ अमेरिकेत होते. वडील- पुत्राची समोरासमोर चोकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या विविध कंपन्यांमध्ये त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळही सहसंचालक आहेत. इडीने पंकज भुजबळ यांना हजर होण्यासाठी समन्स बजावले होते.

पुढील स्लाइडवर याचा, समीर भुजबळ यांना 14 दिवसांची कोठडी