आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकज उधास, जलोटांसह इतर गझलगायकांच्या अदाकारीचा ‘खजाना’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कर्करोग आणि थॅलेसेमिकग्रस्त मुलांच्या मदतीसाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने द कॅन्सर एड असोसिएशन (सीपीएए), द पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘खजाना’ या गझल महोत्सवाच्या सोळाव्या पर्वाचे आयोजन २१ व २२ जुलै रोजी नरिमन पॉइंट येथील द ओबेरॉय हॉटेलमधील रिगल रूममध्ये करण्यात आले आहे.  

‘खजाना– द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ ही गेली सोळा वर्षे यशस्वीपणे राबवली जात असलेली संकल्पना असून यात गझल गायकांना आपली कला रसिकांसमोर सादर करण्यासाठी यथोचित असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यंदाच्या वर्षी खजाना गझल महोत्सवातील कार्यक्रमांबद्दल एका माहिती देण्यात आली. त्या वेळी प्रख्यात गझलगायक पंकज उदास, भूपिंदर आणि मिताली सिंग, अनुप जलोटा, तलत अजीज, गायिका रेखा भारद्वाज, गायक जावेद अली, पॅपोन, सुदीप बॅनर्जी  गायिका सोनम महापात्रा, गायक पार्थिव गोहिल, समीर दाते, गझलगायिका दीपाली दाते आदी मान्यवर उपस्थित होते. ‘खजाना’ या गझल महोत्सवात गझलप्रेमींना भारतातील आघाडीच्या आणि नावाजलेल्या गझल गायकांच्या अदाकारीचा आनंद २१ व २२ जुलै रोजी रोज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या  कार्यक्रमात घेता येईल. हे  सर्व कलाकार या महोत्सवामध्ये आपली अदाकारी सादर करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...